अकोल्यात चाकुने भोसकून युवकाची हत्या, मोठ्या उमरीतील घटना, चार आरोपी ताब्यात!

0

अकोला : जुन्या वादातून मोठी उमरी येथील रहिवासी गोपाल सुनिल शिंदे नामक युवकाची चाकुने भोसकून हत्या केल्याची घटना गुरुवारी टिळक राष्ट्रीय शाळेच्या मैदानात घडली. या प्रकरणी सिव्हील लाइन्स पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यापैकी दोन जण अल्पवयीन असल्याची माहिती पुढे येतत आहे.

सिव्हील लाइन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबातची सविस्तर माहिती अशी की, गोपाल सुनिल शिंदे (२४) हा मोठी उमरी भागातील गायत्रीनगर स्थित भुईभार लेआउट परिसरातील रहिवासी होता. प्रेम पांडे व शुभम जगदाडेसह इतर दोन अल्पवयीन मुलांसोबत गोपालचा जुना वाद होता. मदरम्यान, गुरुवारी दुपारच्या सुमारास गोपाल हा त्याच्या घरी जेवण करीत असताना मारेकऱ्यांनी मृतक गोपाल सुनिल शिंदे याला फोन करून टिळक राष्ट्रीय शालेच्या मैदानावर भेटायला बोलावले.

गोपाल तेथे पोहोचल्यावर त्यांच्याच शाब्दिक वाद झाले. यानंतर मारेकऱ्यांनी गोपालच्या पोटात आणि पाठीत चाकू भोसकला. तसेच दगडाने हल्ला केला. हल्ल्यात गोपाल गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. थोड्याच वेळात गोपालची हत्या झाल्याचा फोन गोपालच्या आईला आला. त्यांनी तत्काळा घटनास्थळ गाठले.

मुलाचा मृतदेह पाऊन त्यांना मोठा धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच सिव्हील लाईन पोलीस ठाण्याचे ठाणेदार भानुप्रताप मडावीसह स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणी पोलिसांनी प्रेम पांडे व शुभम जगदाडे यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना अटक केली. पुढील तपास पालीस करीत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.