सातपूरमध्ये बंदुकीतून गोळी झाडून तरुणाची आत्महत्या, प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल उचलल्याचा पोलिसांना संशय!

0

नाशिक : सातपूर मध्ये बंदुकीतून गोळी झाडून तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तरुणाच्या मृतदेहाजवळ बंदूक आढळून आल्याने, हा घात की अपघात अशी चर्चा लोकांमध्ये रंगत आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, सातपूरमधील एका तरुणााने देशी बनावटीच्या बंदुकीतून स्वतःच्या छातीवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. शनिवारी सकाळी ८ वाजता ही घटना उघडकीस आली आहे. याबाबत सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मयत रोहित राजेंद्र नागरे (वय २८ रा. शिवनेरी चौक, आठ हजार वसाहत, सातपूर कॉलनी ) हा दि.१३ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री बारा वाजता घरातून कोणालाही काहीही न सांगता आपली दुचाकी (पल्सर १५० एमएच.१५ एफजे ४६८७) घेवून गेला होता.  रात्री १२ ते पहाटे ४ वाजेच्यादरम्यान सातपूर औद्योगिक वसाहत व भवर मळा या परिसरात तो फिरत होता. अखेर पहाटेच्या सुमारास त्याने या भागातून जाणाऱ्या नाल्याच्या कडेला असलेल्या झाळाजवळ स्वतःच्या बंदुकीतून गोळी झाडत आत्महत्या केल्याचे प्रथदर्शनी दिसत आहे. 

दरम्यान, घटनास्थळावरून देशी बनावटीची बंदूक व त्याची दुचाकी देखील मिळाली आहे. बंदुकीतून एकच गोळी झाडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. रोहित याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसून, त्याचे कोणाशीही वाद अथवा भांडण नसल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. पोलिसांनी शेवटचे फोन कॉल्स व इतर माहिती घेण्यासाठी रोहित यांचा मोबाईल ताब्यात घेतला असून, मोबाईल मधील व्हॉटस अँप स्टेट्स तपासले असता सर्व स्टेट्स प्रेमभंग अथवा प्रेमप्रकरणातून आत्महत्या झाल्याचे दिसून येत असल्याने सातपूर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची घटना नोंदविण्याचे काम सुरु आहे.

रोहितने आत्महत्या केली की कोणी आत्महत्या चा बनाव करून हत्या केली यांचा अधिक तपास सातपूर पोलीस करीत आहेत. यावेळी सहायक पोलीस आयुक्त विजय खरात, सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे, गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल, मनसे गटनेते सलीम शेख आदी घटना स्थळी माहिती घेण्यासाठी उपस्थित होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.