सांबराच्या शिंगांची तस्करी करणाऱ्या तरूणाला मुद्देमालासह अटक

0
जळगाव  : शहरातील गोलाणी मार्केटजवळ सांबरची शिंगांची तस्करी करणाऱ्या तरूणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी दुपारी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील मुद्देमालासह कार जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथून जळगावात सांबरचे सिंगे विक्रीसाठी कारमध्ये घेवून येत असल्याची स्थानिक गुन्हे शाखेच्या पो.कॉ. दिपक पाटील यांना गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांच्या पथकाने आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शहरातील गोलाणी मार्केटमध्ये दाखल झाले. मार्केटजवळील हनुमान मंदीराजवळ स्विप्ट कार क्रमांक (एमएच १९ सीएफ ३१०६) दिसून आली. कारची तपासणी केली असता त्यात सांबर प्राण्याचे दोन शिंगे असल्याचे दिसून आले.
शिंगांबाबत कार चालक मोहम्मद तरबेज मोहम्मद गालीब (वय-२२) रा. खडका रोड, भुसावळ यांची विचारणा केली असता काहीही उत्तर दिले नाही. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून माहिती घेतली असता सांबर या प्राण्याची शिंगे असल्याने संशयित आरोपी मो. तरबेज हा शिंगांची तस्करी करत असल्याचे निष्पन्न झाले. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील, पोहेकॉ सुनिल दामोदरे, पो.ना. प्रमोद लाडवंजारी, पो.कॉ. दिपक पाटील यांनी कारवाई केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.