अबब… अंबानींच्या सुनेच्या हातातील पर्सची किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल; पर्सच्या किंमतीत एक गुंठा जमीन खरेदी करता येईल!

श्लोका कायमच तिची छाप इतरांवर पाडून जाते

0

लोकराष्ट्र वृत्तसेवा

रिलायन्स उद्योग समुहाला यशोशिखरावर नेणाऱ्या मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या कुटुंबाविषयीची कोणतीही माहिती सर्वसामान्यांना थक्क करते. सध्या याच कुटुंबातील सुनेनं म्हणजेच श्लोका मेहतानं सर्वांनाच तिच्या स्टाईल स्टेटमेंटनं थक्क केलं आहे. एक पत्नी, आई, सून असण्यासोबतच श्लोका तिची अशी वेगळी ओळखही टिकवून आहे. सेलिब्रिटी वर्तुळात वावरणं असो किंवा मग व्यवसाय क्षेत्र आणि समाजहिताच्या कामात पुढाकार घेणं असो, श्लोका कायमच तिची छाप इतरांवर पाडून जाते.

हल्लीच तिचा २०१९ मधील एक व्हिडीओ आणि काह फोटो व्हायरल होत आहेत. पती, आकाश अंबानी याच्यासोबत ती एका कार्यक्रमासाठी पोहोचली होती. त्यावेळी तिच्या स्टायलिश लूकसोबतच नजरा खिळल्या त्या हातात असणाऱ्या क्रिस्टल पर्सवर. श्लोकाच्या हातात तेव्हा दिसलेली पर्स ‘जूडिथ लीबर’ या ब्रँडची होती. ९० च्या दशकातील बुम बॉक्स या संकल्पनेवर आधारित ही पर्स श्लोकाच्या लूकला परिपूर्ण करत होती. बूमबॉक्स ब्रुकलिन मुकी पर्ससाठी श्लोकानं ५,९९५ युएस डॉलर्स, म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास ४, ५७,०९१ रुपये इतकी मोठी रक्कम मोजली होती.

तीन वर्षांपूर्वीच्या तिच्या या लूकची चर्चा आता होत असतानाच पर्सची किंमत अनेकांनाच हैराण करत आहे. काही सर्वसामान्यांनी तर, या पैशांत आम्ही एक गुंठा जमीन खरेदी करू अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर, काहींनी ही लाखोंची रक्कम म्युच्युअल फंड आणि इतर ठिकाणी गुंतवू असंही म्हटलं आहे. असो, हा ज्याचात्याचा दृष्टीकोन. पण, श्लोकाच्या या पर्समुळे एक भन्नाट संकल्पना सर्वांनीच पाहिली हे नाकारता येणार नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.