IPL 2022 : धोनीकडे पुन्हा कर्णधारपद येताच चेन्नईने मिळवला शानदार विजय; हैदराबादवर १३ धावांनी मात!

ऋतुराज गायकवाडचं शतक अवघ्या एका धावेने हुकलं

0

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क

सुरुवातीचे काही सामने हरल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जचे यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येते की काय? असे चित्र निर्माण झाले होते. लागोपाठ परभवाला सामोरे जावे लागल्याने संघाचा कर्णधार रवींद्र जडेजा याना तडकाफडकी कर्णधार पदाचा राजीनामा दिल्याने पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व महेंद्र सिंह धोनी याच्याकडे आलं. पण त्याचबरोबर संघ पुन्हा एकदा विजयाच्या ट्रॅकवर परतला की काय? असे चित्र दिसून आले.

होय, महेंद्रसिंह धोनी याच्याकडे कर्णधार पदाची सूत्रे येताच संघाने सनरायजर्स हैदराबादला पराभवाची चव चाखायला लावली. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या आयपीएलच्या ४६ व्या सामन्यात चेन्नईने हैदराबाद संघावर १३ धावांनी विजय प्राप्त केला. या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्लीच्या संघानं चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यानंतर चेन्नईच्या संघानं २० षटकात २ विकेट्स गमावून २०२ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादच्या संघाला २० षटकात ६ विकेट्स गमावून धावा १८९ करता आल्या.

नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या चेन्नईच्या संघाची सुरुवात चांगली झाली. चेन्नईचे सलामीवीर डेव्हॉन कॉन्वे आणि ऋतुराज गायकवाडनं पहिल्या विकेट्ससाठी १८२ धावांची भागेदारी केली. परंतु, आठराव्या षटकात टी नजराजनच्या गोलंदाजीवर ऋतुराज गायकवाडनं आपली विकेट्स गमावली. केवळ एका धावानं ऋतुराज गायकवाडचं शतक हुकलं. तो ९९ धावांवर बाद झाला. त्यानंतर दोन षटक शिल्लक असताना कर्णधार महेंद्रसिंह धोनी मैदानात आला.

परंतु, मोठे फटके मारण्याच्या नादात तोही बाद झाला. ऋतुराज गायकवाडसहं सलामी देण्यासाठी आलेल्या डेव्हॉन कॉन्वेनं चांगली फलंदाजी केली. त्यानं ५५ चेंडूत नाबाद ८५ धावा केल्या. ज्यामुळं चेन्नईच्या संघानं हैदराबादसमोर 203 धावांचं लक्ष्य ठेवलं. हैदराबादकडून टी नटराजननं दोन विकेट्स घेतल्या.

चेन्नईच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या हैदराबादच्या संघाची सुरुवात चांगली झाली. पंरतु, सहाव्या षटकात मुकेश चौधरीच्या गोलंदाजीवर हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा माघारी परतला. त्यानंतर लगेच सातव्या षटकात राहुल त्रिपाठी शून्यावर बाद झाला. दरम्यान, हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसननं संघाची एक बाजून रोखून ठेवली. या सामन्यात एडेन मार्करामला काही खास कामगिरी करता आली नाही.

१० चेंडूत १७ धावा करून तो माघारी परतला. हैदराबादच्या डावातील पंधराव्या षटकात कर्णधार केन विल्यमसन बाद झाला. त्यानं ३७ चेंडूत ४७ धावांची संयमी खेळी केली. केन विल्यमसननंतर निकोलस पूरन आक्रमक फलंदाजी करत संघाला विजय मिळून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, दुसऱ्या बाजूनं फलंदाज बाद होत असल्यानं त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. त्यानं ३३ चेंडूत ६४ धावा केल्या. चेन्नईकडून मुकेश चौधरीनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, मिचेल सँटनर आणि ड्वाईन ड्वेन प्रिटोरियस यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.