‘तिच्यासोबत लग्न करणार काय?’ शाळकरी मुलीवर बलात्कार करणाऱ्याला सुप्रिम कोर्टाचा सवाल’

अटक टाळण्यासाठी संशयित आरोपीने सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली होती

0

नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्य विद्युत उत्पादन (MSEPC) उत्पादन कंपनीत तंत्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या मोहिम सुभाष चव्हाण याच्यावर एका शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असता, त्याने अटक रोखण्यासाठी सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती. त्याच्या या अर्जावर सुनावणी करताना सुप्रिम कोर्टाने आरोपीला ‘तिच्याशी लग्न करणार का’ अशी विचारणा केली. संशयित आरोपींनी आपल्यास या गुन्ह्यात अटक झाल्यास आपल्याला सरकारी नोकरी गमवावी लागेल, असा बचाव केला होता. त्यावर सरन्यायाधिश शरद बोबडे यांनी त्याला विचारले की, जर तू लग्न करणार असशील तर आम्ही मदत करू शकतो, जर नाही तर तुझी नोकरी जाईल आणि तुला जेलमध्ये जावं लागेल. मुलीचा छळ आणि बलात्कार करण्याआधी याचा विचार करायला हवा होता.’ अशा शब्दात सरन्यायाधिशांनी संशयित आरोपीला सुनावले.

संबंधिताच्या याचिकेवर सुनावणी देताना सरन्यायाधिश म्हटले की, ‘तू तिच्यासोबत लग्न करणार का?’ अशी विचारणा केली. यावर आरोपीच्या वकिलाने यासंबंधी सूचना घेऊ असं उत्तर दिलं. त्यावर सरन्यायाधीशांनी म्हटलं की, याचा विचार मुलीचा छळ आणि बलात्कार करण्याआधी व्हायला हवा होता. तू सरकारी कर्मचारी आहेस हे तुला माहिती होतं. आम्ही तुला लग्नासाठी जबरदस्ती करत नाही आहोत. पण जर करण्याची तयारी असेल तर आम्हाला कळवावं. नाही तर आम्ही तुझ्यावर जबरदस्ती करत आहोत असं सांगशील.

यावेळी आरोपीचा वकील आपण यासंबंधी चर्चा करुन निर्णय कळवू असं सांगत होते. नंतर आरोपीने म्हटलं की, मला आधी लग्न करण्याची इच्छा होती. पण तिने नकार दिला. आता मी विवाहित असल्याने लग्न करु शकत नाही, याशिवाय खटला सुरु असून अद्यापही आरोप सिद्ध झाले नसल्याचंही त्याने म्हटलं. मी सरकारी कर्मचारी असून जर अटक झाली तर आपोआप निलंबित होईन, असं त्याने कोर्टाने सांगितलं. म्हणूनच आम्ही तुला हा पर्याय दिला आहे. आम्ही चार आठवड्यांसाठी अटक स्थगित करत आहोत. नंतर तू नियमित जामीनासाठी अर्ज करु शकतोस, असं सरन्यायाधीशांनी आरोपीला सांगितलं. ट्रायल कोर्टाने आरोपीला अटकेपासून संरक्षण दिलं होतं, पण उच्च न्यायालयाने फेटाळलं.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.