विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या मागण्यांचा विचार करणार : कुणाल पाटील

0
धुळे :  राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे जनतेचे सरकार असून ते विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांच्या मागण्यांचा निश्‍चितच सकारात्मक विचार केला जाईल. या शिक्षकांच्या मागण्या सोडविण्यासाठी सरकारकडे मी नक्कीच पाठपुरावा करेन अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे  कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे शिक्षकांच्या आंदोलनस्थळी दिली.
आपल्या  विविध मागण्यांसाठी राज्यातील अशंत: अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचे आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे. आंदोलनकर्त्या शिक्षकांची काँग्रेस कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांनी भेट घेतली. दि.१३ सप्टेंबर २०१९ नुसार घोषित अनुदान मंजुर २० टक्के व वाढीव ४० टक्के वेतनाचा निधी वितरणाचा आदेश प्रचलित तात्काळ काढावा, अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा निधीसह घोषित कराव्यात, मेडिक्लेम व सेवा शर्ती लागु कराव्यात अशा विविध मागण्यांसाठी खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक समन्वय संघाने महाराष्ट्रातील शिक्षकांचे  मुबंईत आंदोलन सुरु आहे.
यावेळी आंदोलनकर्त्या शिक्षकांशी चर्चा करतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले कि, शिक्षकांच्या मागण्यांचा पाठपुरावा करुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही कार्याध्यक्ष आ.पाटील यांनी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.