प्रेमात वेडा झालेल्या तरुणाला विधवा महिलेने दिला नकार; आता ना राहिला पुरुष ना स्त्री; वाचा धक्कादायक घटना!

मध्यप्रदेशातील भोपाळ येथे ही घटना घडली

0

लोकराष्ट्र वृत्तसेवा

प्रेमात कधी काय होणार याची शाश्वती नसते. प्रेमामुळे अनेकांचे आयुष्य सावरले तर कित्येकाचे उद्धवस्त झाल्याचेही आपण बघितले आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमधून अशीच एक अजब घटना समोर आली. प्रेमात पडलेल्या या तरुणाचे असे काही झाले की, आता तो ना पुरुष राहिला ना स्त्री अशी त्याची गत झाली.

एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करणारा हा तरुण एका लहान मुलीच्या विधवा आईच्या प्रेमात पडला. कोणत्याही स्थितीत त्या महिलेशी लग्न करायचेच अशी खुनगाठच त्याने बांधली. त्यामुळे त्याने त्या महिलेसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. पण त्या महिलेने त्यास नकार दिला. मात्र अशातही त्याला त्या महिलेसोबत राहायचेच होते.

त्यामुळे त्याने जेंडर चेन्ज करण्याचा निर्णय घेतला.  तशी ट्रिटमेंटही सुरू केली. मात्र काउन्सेलिंगनतर त्याने ट्रिटमेंट थांबवली. एका वेबसाइटने दिलेल्या वृत्तनुसार, ३२ वर्षीय तरुण एका श्रीमंत कुटुंबातील आहे. त्याचे वडील मोठे अधिकारी आहेत. तो दिल्लीत एका मल्टीनॅशनल कंपनीत कामही कररतो. मात्र आई-वडिलांच्या लक्षात आलं की, आपल्या मुलाचं वागणं बदललं आहे.

तो ट्रिटमेंट घेत असल्याने त्याच्या हार्मोन्समध्ये बदल होत होता. तो चिडचिड करत होता. एकटा राहत होता. त्यानंतर ते मुलासोबत बोलले आणि तेव्हा या घटनेचा खुलासा झाला. तरुणाई आई वडिलांना सांगितलं की, त्याच्या ऑफिसमध्ये त्याची एक विधवा महिलेसोबत भेट झाली. तो तिच्यया प्रेमात पडला.

महिलेच्या पतीचा दोन वर्षाआधीच कोरोनामुळे मृत्यू झाला. तिला एक मुलगीही आहे. त्याने तिला लग्नासाठी विचारलं तर तिने नकार दिला. त्यानंतर तो तिला म्हणाला की, कोणत्याही स्थितीत त्याला तिच्यासोबत राहायचं आहे. तिला मदत करायची आहे. तरुण तिला म्हणाला की, जर ती त्याला पुरुष म्हणून स्वाकारू शकत नाही तर तो जेंडर चेन्ज करेल आणि महिला बनून तिच्यासोबत राहिल.

इतकंच नाही तर त्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने जेंडर चेन्जची ट्रिटमेंटही सुरू केली. मुलाची ही अवस्था पाहून त्याच्या आई-वडीलांनी त्याची काउन्सेलिंग करण्याचा निर्णय घेतला. विधवा महिलेनेही त्याला समजावलं. हे प्रकरण नंतर ॲडव्होकेट आणि काउन्सेलर सरिता राजानीकडे गेलं.

राजानी यांनी सांगितलं की, तरुण आणि महिलेची काउन्सेलिंग केली गेली. तरुणाची जेंडर चेन्जची ट्रिटमेंट रोखण्यात आली. त्यांनी सांगितलं की, महिलेने तरुणाला सांगितलं होतं की, ती आता कोणत्याही दुसऱ्या पुरुषाला पतीच्या रूपात स्वीकारू शकत नाही. त्यानंतरही त्याने तिचा नाद सोडला नाही आणि त्याला तिची शक्य ती मदत करायची होती. तरुणाने निर्णय घेतला होता की, जेंडर चेंज केल्यानंतर तो महिलेसोबत राहिल. सध्या त्याची काउन्सेलिंग सुरू आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.