कोण आहे दिशा रवी, टूलकिट प्रकरण म्हणजे काय? पोलिसांनी तिला का अटक केली?, वाचा सविस्तर!

सध्या देशात २१ वर्षीय दिशा रवीची सर्वत्र चर्चा होत आहे

0

लोकराष्ट्र : शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ केल्या गेलेल्या सेलिब्रिटी ट्विट प्रकरणानंतर देशात ‘टूलकिट’ प्रकरण गाजत आहे. या प्रकरणाशी संबंधित पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या एका २१ वर्षीय दिशा रवी नावाच्या मुलीला अटक केल्याने देशात एकच वादंग निर्माण झाले आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रातून याबाबत तिव्र प्रतिक्रिया उमटत असून, दिशा रवीला अटक कशी केली जाऊ शकते? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी दिशाला ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात तिचा सहभाग असावा या संशयातून शनिवारी बंगळुरूमधून तिला अटक करण्यात आली आहे. मात्र दिशा रवी कोण असा सवाल आता देशातील जनता विचारत आहे. त्याचबरोबर ‘टूलकिट’ प्रकरण नेमके काय आहे? याचे उत्तर मागितले जात आहे. 

वास्तविक दिशा रवी ‘टूलकिट गुगल डॉक्युमेंट’ची संपादक आहे. केंद्र सरकारच्या तीन्ही नव्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ टूलकिट गुगल डाक्युमेंट बनविण्यात दिशाचा सहभाग असावा असा पोलिसांना संशय आहे. हे डॉक्युमेट बनविण्यात व त्याचा प्रचार, प्रसार करण्यात दिशाची मुख्य भूमिका असू शकते. ग्रेटा थनबर्गने सुद्धा शेतकरी आंदोलनाला पांठिबा देताना टूलकिट शेअर केले होते. या ‘टूलकिट’मधील माहिती ‘पोएटिक जस्टिस फाऊंडेशन’ या खलिस्तान समर्थक गटाशी संबंधित असल्याचे दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले होते.

दरम्यान, दिशा रवीला अटक केल्यानंतर पोलिसांनी तिला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, दिशाच्या अटकेवरून आता सामाजिक गट विरोधात उतरले आहेत. त्याचबरोबर राजकीय पक्षांकडूनही सरकारचा विरोध केला जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिशाला अटक म्हणजे लोकशाहीवर हल्ला असल्याचे म्हटले आहे.

कोण आहे दिशा रवी

पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या दिशा रवीने बंगळुरूच्या खासगी कॉलेजमधून बॅचलर ऑफ बिझनेस डमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी घेतली आहे. तसेच  ‘फ्रायडेज फॉर फ्युचर इंडिया’ या ग्रुपची ती संस्थापक सदस्य आहे. हा ग्रुप म्हणजे ऑगस्ट २०१८ मध्ये सुरु झालेली एक चळवळ आहे. ग्रेटा थनबर्गने पर्यावरण बदलाच्या विषयावर आंदोलन सुरु करुन, जगाचे लक्ष या महत्त्वाच्या मुद्याकडे वेधले, त्यावेळी ‘फ्रायडेज फॉर फ्युचर इंडिया’ ही चळवळ सुरु झाली. वनस्पति आधारीत अन्न-पदार्थ बनवणाऱ्या कंपनी सोबत सुद्धा दिशा रवी काम करते. या कंपनीचे अन्नपदार्थ परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.