कुठे गेलं हिंदुत्व?, सलमान खानच्या ईद पार्टीला उपस्थित राहणाऱ्या कंगना रणौतला नेटकऱ्यांचा सवाल

अनेकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं

0

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क

मुंबई : ईदनिमित्त बॉलिवूडचा दबंग सुरपस्टार सलमान खान याने मुंबईत एका शानदार पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. अभिनेत्री जॅकलीन फर्नान्डिस, करिष्मा कपूर, बिग बॉस फेब शहनाज गिल यांनी या पार्टीला हजेरी लावली होती. त्याचबरोबर कंगना रणौत ही देखील या पार्टीला हजर राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

गेल्या काही दिवसांपासून कंगना रणौत हिंदुत्व या मुद्यावरून चांगलीच चर्चेत आहे. अशात ती ईदच्या पार्टीला उपस्थित राहिल्याने अनेकांनी तिला हिंदुत्वाची आठवण करून दिली. सोशल मीडियावर तिला ट्रोल करताना अनेकांनी तिला हिंदुत्वाच्या मुद्यावरून प्रश्न उपस्थित केले. काहींनी तर कुठे गेले हिंदुत्व असा संतप्त सवालही उपस्थित केला.

दरम्यान कंगनाच्या देसी लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत. या पार्टीत कंगनाने ऑफ व्हाईट आणि गोल्डन रंगाचा शरारा सूट परिधान केला आहे. या पार्टीत एन्ट्री घेण्यापूर्वी तिने सर्वांना ईद मुबारक अशा शुभेच्छाही दिल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.