Career : करिअर निवडताना या बाबींचा करा विचार

0

करिअरची योजना ही जीवनभर चालणारी प्रक्रिया असून तिची सुरुवात आपल्या पसंतीच्या अभ्यासक्रम निवडण्यापासून, नोकरी मिळवण्यापासून आणि त्यात प्रगती करण्यापासून होते. योग्य करिअर निवडताना आणि योग्य निर्णय घेताना हुशारीने निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते. करिअरची निवड हे खरोखर वेळखाऊ काम आहे. इथे दिलेल्या काही सूचना तुम्हाला कोणता विषय व करिअर निवडावे यात मदत करतील.

आवड 

करिअर निवड करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवड. कोणत्याही विषयाचे अध्ययन करताना, लेक्चर ऐकताना, प्रॅक्टिकल करताना किंवा अभ्यासक्रम पूर्ण करताना आनंद लुटण्यास महाविद्यालयीन दर्जात सुधारणा होण्याच्या आणि पुढे कामकाजी जीवनास सुरुवात केल्यावर व्यवसायात यशस्वी होण्याच्या संधीमध्ये वाढ होते.

कौशल्य

करिअर निश्चित करताना विचारात घेण्याजोगी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्याकडील कौशल्यसंच. कुटुंबातील सदस्यांशी, मित्रांशी आणि शिक्षकांशी बोलून तुमच्या कौशल्याविषयी अधिकाधिक जाणून घ्या. ज्यात तुमच्यातील नैसर्गिक कौशल्यांचा संच उपयोगात आणला जातो, असा अभ्यासक्रम शिकताना अभ्यासात यशस्वी होण्याच्या आणि व्यवसायिक प्रगती साधण्याच्या संधी वाढतात.

प्राधान्यक्रम 

तुमच्या निवडीचा प्राधान्यक्रम ठरवा. काम करताना आरामदायी वाटत असेल, तर त्या आणि त्यातून तुमच्या गरजांची पूर्तता होत असेल, तर त्या कामातून आनंद मिळतो. उदा. तुम्हाला प्रवासाचा तिटकारा असेल, तर पर्यटन व्यवसायातील करीअरची निवड करू नका.

कामाच्या वातावरणाची निवड 

जीवनशैलीला अनुरूप असे वातावरण निवडल्यास, ते तुमच्या कामकाजी जीवनास फायदेशीर ठरते. यात भवताल लोक आणि तुमच्या पसंतीची कामे यांचा समावेश होतो. उदा. तुम्हाला दम्याचा विकार असल्यास सिव्हील इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम निवडू नका, कारण त्याला प्रत्यक्ष कार्यस्थळावर जाऊन खूप काम करावे लागते.

कामातील समाधान

कामातील समाधान फार महत्त्वाचे आहे. समाधानाची जाणीव करून देणा-या करीअरची निवड महत्त्वाची आहे आणि तीच यशाची अंतिम गुरुकिल्ली आहे. उदा. तुम्हाला आरेखन करायला आवडत असल्यास, वास्तुकलेतील अभ्यासक्रम निवडा. खेळ, चित्रकला, डिझायनिंग अशा तुम्हाला सर्वाधिक आनंद देणा-या पर्यायांची निवड करा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.