पश्चिम बंगालच्या राज्यमंत्र्यांवर बॉम्बहल्ला, गंभीर जखमी झाल्याची माहिती!

0

कोलकाता : सध्या पश्चिम बंगाल चांगलेच धुमसत आहे. राज्यात राजकीय वातावरण चिघळल्याने अनेक अप्रिय घटनाही समोर येत आहे. आता तर चक्कम पश्चिम बंगाचे राज्यमंत्री झाकीर हुसेन यांच्यावर चक्क बॉम्बहल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, हुसेन यांच्यासह डझनभर कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यासह डझनभर कार्यकर्तेही या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

बुधवारी रात्री साडेनऊ वाजता मुशींदाबाद येथे निमातिया रेल्वे स्थानकावर हा हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला कोणी केला याबाबतची अद्यापपर्यंत कुठलीच माहिती समोर आली नाही. दरम्यान, अज्ञात हल्लेखोरांनी हुसेन आणि कार्यकर्त्यांच्या दिशेने बॉम्ब फेकले. यात हुसेन यांच्या पायाल गंभीर जखम झाली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी यासंबंधी कोणालाही माहिती दिली नव्हती.

तृणमूलच्या मुशींदाबाद जिल्हाध्यक्ष अबू ताहेर यांनी दिलेल्या माहितीनुसार हुसेन यांना सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांना कोलकत्याला हलविण्यात येणार आहे. दरम्यान, पोलीस या घटनेचा सखोल दपास करीत असून, हल्लेखोरांना पकडण्याचे आव्हान असणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.