IND v/s ENG : दुसरी कसोटी, नाणेफेक जिंकून विराट कोहलीचा फलंदाजीचा निर्णय, हा फलंदाज शुन्यावर बाद!

0

चेन्नई : पहिल्या कसोटी दारूण पराभव झालेल्या भारतीय संघाला पुढील कसोट्यांमध्ये विजय मिळवणे खूपच गरजेचे आहे. त्यामुळे शनिवारपासून सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरला आहे. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.  आतच आलेल्या माहितीनुसार भारताने एक विकेट गमावून ४८ धावा केल्या आहेत. शुभमन गिल शुन्यावर आउट झाल्यानंतर रोहित शर्मा (४१) आणि चेतेश्वर पुजारा (७) यांनी धुरा सांभाळली आहे. 

दरम्यान, दुसऱ्या कसोटीत कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संघात तीन मोठे बदल करण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्म सिराजला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याशिवाय तब्बल दोन वर्षानंतर कुलदीपचे संघात आगमन झाले आहे. तसेच अक्षर पटेल याला वॉशिंगटन सुंदर आणि शाबाज नदीम यांच्याजागी स्थान देण्यात आले आहे.

दरम्यान, पहिल्या कसोटीतच अक्षर पटेल रवींद्र जडेजाच्या जागी कसोटीत पदार्पण करणार असल्याचे निश्चित झाले होते. मात्र दुखापतीमुळे तो ही कसोटी खेळू शंकला नसल्याने संघात शाहबाज नदीमला संधी देण्यात आली होती. परंतु अक्षर आता दुखापतीतून सावरून दुसऱ्या कसोटीत पर्दापणासाठी सज्ज झाला आहे. दुसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी अक्षर पटेल याला पदापर्णाची टोपी देत संघात स्वागत करण्यात आले आहे.

प्रमुख फलंदाजांकडून मोठी अपेक्षा

दुसऱ्या कसोटी सामन्यात प्रमुख फलंदाजांकडून मोठी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली होती. प्रमुख फलंदाज झटपट बाद झाल्याने मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले होते. आता या फलंदाजांकडून मोठी अपेक्षा असणार आहे. त्यांनी मैदानावर अधिकाधिक काळ टिकून राहून फलंदाजी करणे गरजेचे आहे.

भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शुबमन गिल, ऋषभ पंत, अक्षर पटेल , आर. आश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.

इंग्लंडचा संघ –

जो रूट (कर्णधार), डॉमिनिक सिब्ली, रॉरी बर्न्‍स, ऑली पोप, डॅन लॉरेन्स, बेन स्टोक्स, बेन फोक्स (यष्टीरक्षक), मोईन अली,  स्टुअर्ट ब्रॉड, जॅक ली, ऑली स्टोन.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.