शहरातील पाणीपुरवठा उद्या बंद, वीज पुरवठाही होणार खंडीत!

0

नाशिक : गंगापूर धरण परिसरात तांत्रिक कामे चालू असून ते मार्गी लावण्यासाठी उद्या शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत शहरातील काही भागांमध्ये विद्युत पुरवठा होणार नाही. परिणामी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे. त्याचबरोबर सहकार्य करण्याचेही मनपाने आवाहन केले आहे.

गंगापूर धरण परिसरातील पंपिंग केंद्राजवळ जांत्रिक बिघाड झाल्याने शनिवारी त्याच्या दुरुस्तीचे कामे केले जाणार आहेत. या स्टेशनला जोडणाऱ्या प्रमुख वायरची जोडणी करून त्याची चाचपणी केली जाणार आहे. त्याचबरोबर इतर काही तांत्रिक कामे मार्गी लावली जाणार आहेत. त्यामुळे शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळी महावितरण कंपनीला वीजपुरवठा खंडीत ठेवावा लागणार आहे. परिणामी शहरात शनिवारी काही भागांमध्येच पाणीपुरवठा होणार असून, उर्वरीत भागात पाणीपुरवठा होणार नाही. पंचवटी, नाशिकरोड, सातपूर, नाशिक पश्चिम या विभागांमध्ये पाणीपुवरठा होणार नाही.

नवीन नाशिक विभागातील प्रभाग क्र मांक २४, २५, २६ व २८ येथील उंटवाडी, जगताप नगर, कालिका पार्क, इंद्रनगरी, कामटवाडे परिसर, पवननगर, आयटीआय पूल, शिवशक्ती चौक, शाहू नगर, खुटवड नगर, बंदावणे नगर, साळूंखे नगर, महालक्ष्मी नगर, डीजीपी क्र मांक दोन, मुरारी नगर, वावरे नगर, अंबड माऊली लॉन्स परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. नाशिक पूर्व विभागात वडाळा गांव, गावठाण परिसर, वडाळा रोड, जे. एम. सिटी महाविद्यालय, जयदीप नगर, साईनाथ नगर, विनयनगर परिसर, द्वारका, काठे गल्ली, जयशंकर नगर, टाकळी रोड परिसर, उपनगर पगारे मळा, प्रभाग क्र मांक २३ मधील अशोका मार्ग, हिरे नगर, टागोर नगर, डीजीपी नगर, गांधीनगर जलकुंभ १, २, ३ व ४ आणि प्रभाग क्र मांक १६ मधील आंबेडकर नगर, सिद्धार्थ नगर, प्रभाग क्र मांक २३ मधील डीजीपी नगर (कल्पतरुनगर, हॅपी होम कॉलनी, बजरंगवाडी या भागात शनिवारी दूपार आणि सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.