जळगावात अखंड वीजपुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा 

0
जळगांव : शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता शेतातील वीज पुरवठा खंडित केल्यामुळे चाळीसगांव तालुक्यातील  सांगवी येथील संतप्त शेतकऱ्यांनी एका दिवसात खंडित वीज पुरवठा सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे  केला आहे.
चाळीसगांव तालुक्यातील सांगवी येथे शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचाऱ्यांनी शेतातील वीज पुरवठा खंडित केला आहे. कोरोना काळात कोरोनाबरोबर आस्मानी संकटाचाही फटका सामान्यांना बसलेला आहे. बिकट परिस्थिती असताना विद्युत मंडळाकडून शेतकऱ्यांच्या शेतातील पंधरा डिपीचे वीज कनेक्शन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे हे हुकूमशाहीचे लक्षण असल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी शेतकऱ्यांनी नोंदविली.नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता. वीज बिल भरणा करण्यासाठी एका महिन्याची अवधी द्या. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. एका दिवसाच्या आत वीज पुरवठा पुर्ववत करण्यात आला नाही. तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. या निवेदनात शेतात विजपंपाकामी मिटर बसवले आहे. त्यानुसारच वीज बिल वसुली करावे असे निदर्शनास आलेले असताना ज्याने वीज मिटर बसवलेले नाही. अशांचेही अतिरिक्त बिल ग्रामस्थांवर लादले जात आहे.
हे सर्व प्रकार थांबले पाहिजे असे आवाहन निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. या निवेदनावर सरपंच डॉ महेंद्रसिंग राठोड ,  संतोष राठोड, सचिन ठाकरे, दयाराम चव्हाण, भावलाल जाधव, विजय देशमुख, बंडु चव्हाण, भास्कर चव्हाण, ज्ञानेश्वर पवार, संतोष राठोड, प्रकाश राठोड, उदल चव्हाण, गोवर्धन चव्हाण, वाडीलाल राठोड, धारासिंग चव्हाण, रामा राठोड,  मंगेश चव्हाण, तुकाराम चव्हाण, काशीनाथ जाधव आदींच्या सह्या आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.