छावा क्रांतिवीर सेना व किसान सभा उद्या करणार चक्का जाम आंदोलन

0
नाशिक : शेतकरी विरोधी कायद्यां विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनच्या वतीने देशभर चक्का जाम करण्याची हाक देण्यात आली आहे.याच संदर्भात दि.६ फेब्रुवारी रोजी देशभर शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्यासाठी व दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनला पाठिंबा देण्यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाबाबत नियोजन बैठक आज चांदोरी येथे  छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक  करण गायकर, किसान सभेचे राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले, शिवाजी राजे मोरे प्रदेश महासचिव छावा क्रांतिवीर सेना, यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वा चांदोरी चौफुली,ता.निफाड,औरंगाबाद महामार्ग येथे चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
दिल्ली येथे सुरू असलेले शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार अमानुष दडपशाही करत आहे. सरकारने आंदोलन चालू असलेल्या मुख्य चारही स्थळांवर प्रचंड पोलीस बळ तैनात केले आहे. आंदोलकांची रसद तोडण्यासाठी पाणी, वीज, अन्न पदार्थ यांचा पुरवठा पोलीस बळाचा वापर करत तोडण्यात आला आहे. आंदोलन स्थळावरील सत्य जगाला कळू नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आले आहे. शेकडो शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पत्रकारांवर केसेस दाखल केल्या जात आहेत. काही पत्रकारांना जेलमध्ये टाकण्यात आले आहे. शेतकरी नेत्यांवर खटले भरण्यात आले आहेत. आंदोलन स्थळांवर येण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना ठिकठिकाणी अडविण्यात येत आहे. रेल्वे नियोजित मार्गावरून इतरत्र वळविण्यात आल्या आहेत. शेतकरी आंदोलकांना अन्न कोठून येते याचा शोध घेऊन तो पुरवठादेखील खंडित केला जात आहे.
काही पक्षाचे कार्यकर्ते स्थानिक नागरिक असल्याचे भासवत पोलिसांच्या मदतीने आंदोलक शेतकऱ्यांवर दगडफेक करत आहेत. सरकार करत असलेली ही दडपशाही अत्यंत निंदनीय आहे.  सरकारच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दात धिक्कार  आहे. सरकारच्या दडपशाहीचा धिक्कार करण्यासाठी व अन्यायकारक असे तीन शेजारी कायदे रद्द करून आधारभावाचा कायदा मंजूर करून घेण्याच्या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाने दिनांक ६ फेब्रुवारी २०२१ रोजी देशभर रास्ता रोको व चक्काजाम करण्याचे आवाहन केले आहे. या बैठकीस करण गायकर,राजू देसले,शिवाजी मोरे,अनील भोर, देवराम आप्पा निकम, बाबा खालकर,गाडे सर,अनिल गडाख, रोशन टरले,आकाश टरले,सचिन हाडोळे, ओमकार टरले, अभि टरले, प्रज्वल शेटे,प्रकाश गडाख अभिषेक शिंदे , आकाश हिरे, भीमाची गडाख,भास्करराव गायके आदी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

दिल्ली येथे सुरू असलेले शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार अमानुष दडपशाही करत आहे. सरकारने आंदोलन चालू असलेल्या मुख्य चारही स्थळांवर प्रचंड पोलीस बळ तैनात केले आहे.  आंदोलन स्थळावरील सत्य जगाला कळू नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आले आहे. शेकडो शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पत्रकारांवर केसेस दाखल केल्या जात आहेत. काही पत्रकारांना जेलमध्ये टाकण्यात आले आहे. शेतकरी नेत्यांवर खटले भरण्यात आले आहेत. आंदोलन स्थळांवर येण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना ठिकठिकाणी अडविण्यात येत आहे. रेल्वे नियोजित मार्गावरून इतरत्र वळविण्यात आल्या आहेत. शेतकरी आंदोलकांना अन्न कोठून येते याचा शोध घेऊन तो पुरवठादेखील खंडित केला जात आहे. हे हुकुमशाहीचे लक्षण असून, ते कदापी खपून घेतले जाणार नाही.

– करण गायकर, संस्थापक अध्यक्ष, छावा क्रांतिवीर सेना

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.