Photo : पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले वारकरी; हातात विना अन् डोक्यावर फेटा

देहू देवस्थानच्या विश्वस्तांनी घेतली पंतप्रधानांची भेट

0

देहूत होणाऱ्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी संत तुकाराम महाराजांच्या वंशजांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली.

देहूत होणाऱ्या कार्यक्रमाचं निमंत्रण यावेळी देण्यात आलं. पंतप्रधान यांची वेळ घेण्यासाठी ही भेट होती, अस त्यांच्याकडून सांगण्यात आलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुकोबांच्या वंशजांकडून पांढरी पगडी, टाळ, विना, चिपळ्या देत तुळशीची माळ गळ्यात घालून सत्कार करण्यात आला.

तसेच, संत तुकाराम महाराज यांचा ग्रंथ भेट म्हणून देण्यात आला.

कार्यक्रमासंदर्भात लवकरच तारीख कळवण्यात येईल असं पंतप्रधान कार्यालयाकडून देहू संस्थानला कळविण्यात आलंय.

मुळे पुढील महिन्यात होणाऱ्या या सोहळ्याला पंतप्रधान उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.