Video : खुलेआम प्रपोज करणाऱ्या ‘त्या’ तरुणीबरोबर तरुणाचीही कॉलेजमधून हकालपट्टी!

0

लाहोर : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या लाहोर युनिव्हर्सिटी कॅम्पसमधील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक तरुणी तिच्या वर्गात शिकणाऱ्या एका तरुणाला खुलेआम प्रपोज करताना दिसत आहे. तर आजुबाजुला उभे असलेले मुले त्यांचा व्हिडीओ काढत आहेत. जेव्हा हा व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा या दोघांचीही कॉलेजमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर पाकिस्तानात आता या व्हिडीओचे पडसाद उमटताना दिसत आहेत.

विद्यापीठाच्या नियमांचे उल्लंघन करून अशाप्रकारे गैरवर्तन केल्याचा ठपका या मुलांवर ठेवण्यात आला आहे. गेल्या गुरुवारी लाहोर युनिर्व्हसिटीच्या कॅम्पसमध्ये ही घटना घडली असून, सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, व्हिडीओमध्ये तरुणी आता गुलाबाचा पुष्पगुच्छ घेऊन दिसत आहे. गुडघ्यावर बसून ती तिच्या समोर उभ्या असलेल्या तरुणाला प्रपोज करते. तर आजुबाजुला असलेले मुले टाळ्या वाजविताना दिसतात. एखाद्या सिनेमात शोभावा असा हा सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेव्हा ती मुलगी प्रपोज करते तेव्हा समोर उभा असलेला मुलगा तिच्याकडे बघून तो मुगला स्मितहास्य करीत तिला मिठी मारतो.

दरम्यान, या दोघांचा व्हिडीओ जेव्हा विद्यापीठ प्रशासनापर्यंत पोहोचला तेव्हा त्यांनी तातडीने त्या दोघांवर कारवाई केली. गैरवर्तन केल्याचा आणि विद्यापीठाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर विद्यापीठाच्या शिस्तपालन समितीने ठेवलाय. शिस्तपालन समितीने दोन्ही विद्यार्थ्यांना याबाबत विचारणा करण्यासाठी समन्स पाठवले होते, पण दोघेही हजर राहिले नाहीत. अखेर त्यांना कॉलेजमधून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना कॉलेजमधून काढून टाकल्यामुळे ट्विटरवर मात्र अनेक नेटकरी राग व्यक्त करत आहेत. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची मुलगी बख्तावर भुट्टो-झरदारी यांनीही विद्यापीठाच्या कारवाईवर टीका करताना हा थिल्लरपणा असल्याची प्रतिक्रिया ट्विटरद्वारे दिली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.