ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे वृद्धापकाळाने निधन

0

पुणे : एकेकाळी रंगभूमी आणि चित्रपटाची दुनिया गाजविणारे आणि अनेक व्यक्तीरेखांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी स्थान मिळविणारे ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. ६ नोव्हेंबर १९२९ रोजी किलोस्करवाडी येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकातील त्यांच्या कामाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. ‘तुज आहे तुजपाशी’, ‘गरुडझेप’, ‘लेकुरे उदंड जाहली’ शिवाय ‘मधुचंद्र’, ‘सिंहासन’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. पुलं यांच्यासोबत ते जवळपास 50 वर्षे ते कार्यरत होते. श्रीकांत मोघे यांचा मुलगाही कलाविश्वात सक्रीय आहे, श्रीकांत मोघे हे अभिनेता शंतनू मोघे यांचे वडील.

कलाविश्वात नावारुपास येणाऱ्या या अनुभवी कलाकारानं दिल्लीत वृत्त निवेदक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती. अतिशय कमी वयापासूनच कलाविश्वाळी नातं जोडलेल्या श्रीकांत मोघे यांच्या जाण्यानं अनेकांनीच हळहळ व्यक्त केली आहे. चाहते आणि कलाकार मंडळी या नटश्रेष्ठाला आपल्या परिनं श्रद्धांजली वाहत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.