Valentine Day Special : आमीर खानची लेक इरा खानने बॉयफ्रेंडसाठी शेअर केली ‘ही’ खास पोस्ट!

0

मुंबई : व्हॅलेंटाइन डे अर्थात प्रेमाचा दिवस. सध्या या दिवसाची जादू सर्वांवर चढायला लागली आहे. यंदा कोरोनाचे सावट कायम असल्याने, या दिवसाचे उधान कमी असले तरी, बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये याचा उत्साह जोरात आहे. सोशल मीडियावर त्यांचे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल होत असून, त्यांचे प्रेमाचे सोहळे अनेकांना आकर्षित करीत आहेत. 

मिस्टर परफेक्टनिस्ट आमीर खानची लाडकी इरा खान हिचेही काही फोटो असेच व्हायरल होत असून, त्यामध्ये ती तिचा व्हॅलेटाइन प्रियकर नुपूर शिखरे याच्यासोबत या दिवसाला खास बनविताना दिसत आहे.

एका फोटोच्या कॅप्शनमध्ये तर तिने, ‘तू माझ्यासोबत असणं हे माझ्यासाठी सारंकाही आहे. विल यू बी माय व्हॅलेंटाइन?’ असंही ती तिच्या प्रियकराना विचारते. इरा खानने शेअर केलेल्या या फोटोवर आमिर खानासेबत फातिमा सना शेख यांनी कॉमेंट दिली आहे. त्यामुळे दोघांचे हे फोटो सध्या समाज माध्यमामध्ये चांगलेच व्हायरल होत आहेत.

दरम्यान, प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार नुपूर शिखरेचे वडील आमिर खानचे पर्सनल ट्रेनर आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून हे दोघे परस्परांना डेट करत आहेत. इरा खानचे २०१९ मध्ये मिशाल कृपलानीसोबत ब्रेकअप झाले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.