‘या’ प्रकरणी सनी लिओनीची केरळ पोलिसांकडून चौकशी!

एका कार्यक्रमासाठी सनी हजर राहणार होती, त्यासाठी तिने लाखो रूपये ॲडव्हान्स घेतले होते. मात्र ती गैरहजर राहिली

0

पूर्वाश्रमीची पॉर्नस्टार बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. होय, सनीने एका कार्यक्रमासाठी आयोजकांकडून लाखो रुपये घेतले होते, मात्र ती कार्यक्रमासाठी हजरच राहिली नसल्याने आयोजकांनी तिच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे केरळ पोलीस सध्या तिची चौकशी करीत आहेत. शुक्रवारी पोलिसांनी तिची चौकशी करीत याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. दरम्यान, आयोजकांच्या या तक्रारीमुळे सनी खूपच अस्वस्थ झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

याबाबतचे सविस्तर प्रकरण असे की, सनी लिओनी केरळमधील कोच्ची येथे दोन कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होती. त्याकरिता आयोजकांकडून तिने लाखो रुपये ॲडव्हान्स घेतले हाेते. मात्र ऐनवेळी सनी या कार्यक्रमाला गैरहजर राहिली. त्यामुळे कार्यक्रमाच्या आयोजकांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. उपलब्ध माहितीनुसार सनीने आयोजकांकडून २९ लाख रूपये घेतल्याचे समजते. सध्या पोलीस याबाबत कसून चौकशी करीत आहेत.

पोलिसांच्या या चौकशीनंतर अभिनेत्री सनी लिओनी हिने स्पष्टीकरण दिले आहे. तिने म्हटले की, कोरोनाचा संसर्ग असल्याने मी या कार्यक्रमाला उपस्थितीत राहू शकले नाही. तसेच आयोजकांनी या कार्यक्रमात एक दोन नव्हे तर तब्बल पाच वेळा बदल केला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मी या कार्यक्रमासाठी २९ लाख नव्हे तर १२ लाख रूपयेच ॲडव्हान्स घेतले आहेत. हे पैसे लवकरच परत केले जातील, असेही सनीने स्पष्ट केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.