Union Budget 2021 : आज सादर होणार अर्थसंकल्प, कोरोना लस मोफत देण्याबाबत घोषणा होण्याची शक्यता!

0

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पाचीच चर्चा 2021 हे वर्ष सुरु झाल्यापासून पाहायला मिळत आहे. 29 जानेवारीपासून यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली. ज्यानंतर 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बहुप्रतिक्षित असा यंदाचा अर्थसंकल्प सादर करतील. कोरोनाच्या संकटातूनही तरुन जात भारतीय अर्थव्यवस्थेला नवी गती देण्यासाठी आणि त्याचवेळी देशातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या तणावमुक्त करण्यासाठी केंद्राकडून नेमकी कोणती पावलं उचलली जातील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

2021 म्हणजेच यंदाच्या वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन हे दोन भागांमध्ये पार पडणार आहे. ज्यापैकी पहिला टप्पा 29 जानेवारी ते 15 फेब्रुवारी यादरम्यान पार पडणार आहे. तर, दुसरा टप्पा 8 मार्च ते 8 एप्रिल या काळात पार पडणार आहे. याचदरम्यान, निर्मला सीतारमण या केंद्रीय अर्थमंत्री म्हणून, देशाचा आर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर करतील. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सादर केल्या जाणाऱ्या या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व आहे. या अर्थसंकल्पात कोरोना लस १३५ कोटीपेक्षा अधिक भारतीयांना मोफत दिली जाणार काय? याबाबतच्या घोषणेकडे लक्ष असणार आहे.

कोरोनाची लस मोफत दिली जावी काय? यावरून आतच राजकारण सुरू झाले असून, सरकारवर अर्थसंकल्प सादर करताना याबाबतचा मोठा दबाव असणार आहे. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामण याबाबत काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.