बाळासाहेबांची दसरा मेळाव्याची परंपरा उद्धव ठाकरेच पुढे नेतील; जयंत पाटलांनी शिंदे गटाला सुनावले

ठाकरे ज्या बाजूला असतात तोच खरा दसरा मेळावा

0

मुंबई : लोकराष्ट्र वृत्तसेवा

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर खरी शिवसेना कुणाची, हा वाद एकीकडे कोर्टात प्रलंबित आहे. अशातच दुसरीकडे शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याच्या मुद्द्यावरूनही शिवसेना आणि शिंदे गटात चांगलाच वाद पेटला आहे. राजकीय परिस्थितीवरून हा दसरा मेळावा नक्की कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दसरा मेळावा हा खऱ्या शिवसेनाच आहे असे बोलून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पाठींबा दिला. तर शिंदे गटाला खडेबोल सुनावले. जयंत पाटील काल पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मानाच्या पाच गणपतींच्या दर्शनासाठी ते पुण्यात आले होते. यावेळी मानाचा पहिला गणपती पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपतीच त्यांनी दर्शन घेतलं. यावेळी बोलताना त्यांनी दसरा मेळाव्याबाबत भाष्य केले.

दसरा मेळावा हा खऱ्या शिवसेनेचाच आहे. बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केलेला. ठाकरे ज्या बाजूला असतात तोच खरा दसरा मेळावा. दसरा मेळावा हा बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केला आहे. शिवतीर्थ आणि दसरा मेळावा ही परंपरा उद्धव ठाकरे हे पुढे नेतील , असे म्हणत पाटील यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले .

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.