शिवजयंती उत्सवाला गालबोट, विजेचा शॉक लागून दोन तरुणांचा मृत्यू!

घटनेत मृत्यूमुखी पडलेला तरुण एकुलता एक असल्याने त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

0

नाशिक : शिवजयंतीनिमित्त शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात  होर्डिंग्ज्‌ लावण्यात आली आहेत. मात्र गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक झाडे तसेच होर्डिंग्ज कोसळले आहेत. हाच पडलेला फलक पुन्हा लावत अससताना विजेचा शॉप लागून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर यामध्ये दोन तरुण जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना वडनेर रोडवर घडली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, वडनेररोड वरील राजवाड्याकडे जाणाऱ्या चौकात शिवजन्मोत्सव समितीचा फलक लावलेला होता. मात्र गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे हा फलक कोसळला होता. दुपारी रस्त्याने जाणाऱ्या दोन युवकांनी हा पडलेला फलक उचलला आणि उभा करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी वीज तारांचा या फलकाशी संपर्क आल्याने त्याचा जबर शॉक या दोघा तरुणांना लागला. त्यात अक्षय किशोर जाधव (वय २६, रा. वडनेर गाव) आणि राज मंगेश पाळदे (वय २०, रा. सौभाग्य नगर) या दोन तरुणांचा मृत्यू झाला. तर अन्या दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत.

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने चौघानाही बिटको रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र त्यामध्ये अक्षय जाधव आत्रण राज पाळदे या तरुणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.राज पाळदे हा एकुलता एक मुलगा असल्याने, त्याच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, तर अक्षय जाधव यांच्या पश्चात दोन भाऊ आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती कळताच संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात असून, मोठ्या प्रमाणात सर्व शिवभक्त, नागरिक आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.