Crime : गुरुद्वाराच्या बांधकामावरून दोन गटात तुफान हाणामारी

पुणे येथील घटना, एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

0

पुणे : गुरुद्वाराच्या बांधकामाच्या हिशोब मागिल्या प्रकरणी दोन गटात तुफान हाणामारी झाली. त्यात एक जण गंभीर जखमी झाला असून, अन्य ६ जण जखमी झाले आहेत. वानवडी पोलिसांनी दोन्ही गटातील १७ पेक्षा अधिक जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील ९ जणांना अटक केली आहे. ही घटनाल रामटेकडी येथील कलगीधर गुरुद्वारा येथे बुधवारी दुपारी घडली.

ययाप्रकरणी कृष्णासिंग कल्याणी (वया ३०, रा. थोऊरगाव, ता. हवेली) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार हरपालसिंग नेपालसिंग कल्याणी (वया ३०, रा. सोरतापवाडी,  कुंजीरवाडी), नेपालसिंग मोहनसिंग कल्याणी (वय ७२), हसपालसिंग नेपालसिंग कल्याणी (वय २८), तपालसिंग नेपालसिंग कल्याणी (वय ४७) आणि जगपालसिंग नेपालसिंग कल्याणी (वय ४२) यांना अटक केली असून, अन्य व्यक्तींविरूद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामटेकडी येथे कलगीधर गुरुद्वाराचे बांधकाम सुरू असून, त्यासंबंधित बुधवारी दुपारी १२ वाजता गुरुद्वारामध्ये बैठक सुरू होती. फिर्यादी, त्यांचा भाऊ, वडील व पुतण्या संबंधित गुरुद्वारा कमिटीचे सदस्य आहेत. त्यांनी गुरुद्वारा केलेल्या बांधकमाचा कमिटीला हिशोब मागितला. त्यावेळी फिर्यादी व आरोपींमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यानंतर हरपालसिंग कल्याणी याने त्याच्याकडील तलवारीने फिर्यादीचा पुतण्या जसविंदरसिंग गळ्यावर वार करून खुनाचा प्रयत्न केला. तसेच इतर आरोपींनी लाकडी दांडक्याने, लोखंडी सळईने फिर्यादी, त्यांचे वडील, भाऊ व पुतण्याला मारहाण करीत जखमी केले.

याप्रकरणी दुसऱ्या गटातील नेपालसिंग मोहनसिंग कल्याणी (वय ७०, रा. सोरतापवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. जलसिंग धारासिंग कल्याणी (वय ३८), कृष्णासिंग धारासिंग कल्याणी (वय ३७) व हिम्मतसिंग धारासिंग कल्याणी (वय २९) यांना अटक केली असून, इतर ५ ते ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.