Corona Update : राज्यात कोरोनाचा कहर, कोरोनाबाधितांची संख्या उच्चांकी, ४२ मृत्यू!

0

लोकराष्ट्र : बुधवारी राज्यातील कोरोना बाधितांची स्थिती खूपच बिकट झाल्याचे चित्र समोर आले. तब्बल दहा हजारांच्या आसपास नवे रुग्ण वाढल्याने राज्यावरील कोरोनाचे संकट अधिकच गडद झाले आहे. बुधवारी दिवसभरात राज्यात ९ हजार ८५५ नवीन करोनाबाधित वाढले असुन, ४२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४० टक्के एवढा आहे. तर, आज ६ हजार ५५९ रुग्ण बरे होऊन घरी देखील परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २०,४३,३४९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.७७ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६५,०९,५०६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,७९,१८५ (१३.२० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,६०,५०० व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत, तर ३ हजार ७०१ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ८२ हजार ३४३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

केंद्र शासनाच्या आदेशानुसार देशात सध्या करोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला १ मार्चपासून सुरूवात झालेली आहे. ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण या टप्प्यात केले जात आहे. तसेच ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण या तिसऱ्या टप्प्यामध्ये केले जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.