‘माझ्यावर पाळत ठेवली जात आहे’, तृणमूल काँग्रेसच्या खासदाराचा गौप्यस्फोट

घराबाहेर पोलीस तैनात असल्याच्या पुराव्याचे फोटो केले ट्विट

0

नवी दिल्ली : सध्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार, आमदार तसेच स्थानिक नेत्यांच्या पक्षातराची सर्वाधिक चर्चा होत असतानाच तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. या गौप्यस्फोटामुळे उपस्थित खासदारांनाही धक्का बसला आहे. याबात महुआ मोईत्रा यांनी म्हटले की, मागणी केलेली नसतानाही माझ्या घरासमोर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. याबाबतचे त्यांनी ट्विटर अकाउंटवरून ट्विट देखील केले आहेत. त्यामध्ये त्यांच्या दिल्ली येथील निवास्थानाबाहेर काही पोलीस तैनात असल्याचे छायाचित्र त्यांनी ट्विट केले आहेत.

ही पाळत का ठेवली जात आहे? असा सवाल उपस्थित करीत महुआ मोईत्रा यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव आणि बाराखंबा रोड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडे ही सुरक्षा हटविण्याची मागणी केली आहे. दिल्लीतल्या शासकीय निवास्थानाबाहेर शुक्रवारी रात्री दहाला सीमा सुलक्षा दलाचे तीन सशस्त्र जवान त्यांच्या घराबाहेर नेमले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, महुआ मोईत्रा यांच्या निवासस्थानाबाहेर असलेल्या पोलीस आणि जवानांच्या हालचालीवर ते कोणावर तरी नजर पाळत ठेवत असल्याचे दिसत आहे. याबाबत महुआ मोईत्रा यांनी म्हटले की, ते माझ्या हालचालींच्या नोंदी ठेवत आहेत. मी एका पाळतेखाली आहे, असे मला जाणवते. देशाची नागरिक म्हणून राइट टू प्रायव्हसी हा मला घटनेने मूलभूत अधिकार दिला आहे. त्यामुळे माझ्या अधिकारावर गदा न आणता ही सुरक्षा व्यवस्था काढून घ्यावी, अशी मागणी देखील त्ययांनी केली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणादरम्यान खासदार मोईत्रा यांनी माजी सरन्यायाधिश रंजन गोगाई यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावर भाजप सदस्यांनी आक्षेप घेतला होता. कदाचित याच कारणामुळे त्यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था तैनात केली असावी, असा एक मतप्रवाह आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.