धुळे जिल्ह्यात तीन दिवस जनता संचारबंदी, कोरोना संसर्ग झपाट्याने वाढतोय!

0

धुळे : जिल्हयात कोरोनाचा वाढता प्रकोप पहाता जिल्हा प्रशासनाने तीन दिवस जनता संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला असून बाधित आढळलेल्या भागात विशेष लक्ष दिले जाणार आहे. कोरोनाच्या या दुस-या फेजमधे धुळे महानगरात मोठया प्रमाणावर रुग्णसंख्या आढळत असल्याने महानगरपालिकेने बंद केलेले कोवीड उपचार केंद्र सुरु केले असुन यावर लक्ष ठेवण्यासाठी समिती नियुक्त केली आहे.

धुळे जिल्हयात गेल्या महीन्यापासुन पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. आता पावेतो जिल्हयात 18 हजार 327 जणांना कोरोनाची लागण झाली असुन यातील 15 हजार 744 रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. जिल्हयात आता पर्यंत 394 जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. सध्या जिल्हयात 2 हजार 189 ॲक्टीव रुग्ण असुन यातील वैदयकीय महाविदयालयात 157, आण्णासाहेब पाटील महाविदयालयात 90, शिरपुर येथील केंद्रात 50, अन्य जिल्हयात 50 तर मनपाच्या केंद्रात 16 जण उपचार घेत आहेत. लक्षणे नसलेले 1595 जणांना घरीच अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर खासगी दवाखान्यांमधे 231 जण उपचार घेत आहेत.

आता कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याचे दिसुन आल्याने महानगरपालिकेने 120 रुग्णसंख्या असलेले शासकीय पॉलीटेक्नीकमधील केंद्र तसेच जिल्हा रुग्णालय, एससीपीएम कॉलेज , अजमेरा वैदयकीय कॉलेज शासकीय  वैदयकीय महाविदयालयातील कोरोना उपचार केंद्र सुरु करण्यात आले आहे. शासकीय तंत्र निकेतनमधील केंद्रांतील रुग्णांच्या सेवेसाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. यात विदयुत सेवेसाठी एन के बागुल, साफसफाईसाठी लक्ष्मण पाटील , पिण्याच्या पाण्यासाठी लक्ष्मण पावटे तसेच जेवण पुरवठयासाठी राजेंद्र माईनकर यांची समिती गठीत करण्यात आली असुन नोडल ऑफिसर पदाची जबाबदारी मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ महेश मोरे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

गेल्या आठवडयाभरापासुन धुळे जिल्हयात दर दिवशी कोरोना बाधितांचा आकडा तीनशेच्या पार पोहोचत असल्याने जिल्हा प्रशासनाने तातडीने हालचाली करीत व्यापारी संघटनांची बैठक घेवुन सर्व व्यापारी व्यवसाय सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेवुन त्याची अंमलबजावणी करण्यात येते आहे.याबरोबरच आता उदया रविवार सायंकाळी सहा वाजेपासुन बुधवार सकाळी सहा वाजेपासुन जनता संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत सर्व जिवनावश्यक सेवा देणारी यंत्रणा सुरु रहाणार आहे. पण रस्त्यावर विनाकारण फेरफटका मारणा-यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.