सातपूर पोलीस ठाण्याचे तिघा लाचखोरांना रंगेहाथ पकडले

प्रकरण मिटविण्यासाठी मागितली १३ हजार रुपयांची लाच

0
नाशिक : सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राधाकृष्णनगरमधील बोलकर व्हॅली पोलिस चौकीत हेड क्वार्टरमध्ये नेमणूक असलेले दोन व सातपूर पोलिस ठाण्याचा एक कर्मचारी असे एकूण तीन पोलीस कर्मचाऱ्या लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. प्रकरण मिटविण्यासाठी या तिघा लाचखोरांनी २५ हजारांची लाच मागितली होती. 
हिरामण गणपत सोनवणे, सारंग एकनाथ वाघ, राहुल पोपट गायकवाड अशी संशयित लाचखोर पोलिसांची नावे आहेत. लाचलुचपत विभागाने सापळा रचून १३ हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले. दरम्यान अपघाताचे प्रकरण मिटविण्यासाठी, अपघाताच्या गुन्ह्यात अटक न करण्याच्या मोबदल्यात २५ हजाराची लाच मागितली होती. त्यापैकी १३ हजार रुपयांची लाच पोलीस चौकीत स्वीकारणाऱ्या तिघा पोलीस कर्मचाऱ्याना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली अशी माहिती सूत्राकडून समजते आहे.
रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सातपूर पोलीस ठाण्यात सुरु होते. या लाचलुचपत विभागाच्या  कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान जनतेनेही अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची नावे कळावावीत असे आवाहन लाचलुचपत विभागाकडून करण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.