विभागीय केंद्रामध्ये संशोधन व प्रशिक्षण व्हावे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे प्रतिपादन

0
औरंगाबाद : नव्या जगाची गरज ओळखुन आरोग्य विद्यापीठाच्या विभागीय केंद्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यात यावे असे प्रतिपादन विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा.ना.श्री. अमित देशमुख यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयात प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास, ध्येय: शुन्य टक्के रॅगिंग अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन आणि विद्यापीठातर्फे जीवन गौरव पुरस्काराचे वितरण या समारंभात करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी  मा.ना. श्री. अमित देशमुख यांच्या समवेत व्यासपीठावर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ नितीन करमळकर,  माजी कुलगुरू    डॉ दिलीप म्हैसेकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, डॉ. अजित पाठक, श्री. एन.व्ही.कळसकर, डॉ. सचिन मुंबरे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल आदी मान्यवर उपस्थित होते.
      या समारंभात अध्यक्ष स्थानावरुन बोलतांना विद्यापीठाचे मा. प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले की, विद्यापीठातर्फे विविध ठिकाणच्या विभागीय केंद्रामध्ये समुपदेशन केंद्र उभारण्यात यावेत जेणेकरुन त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होउ शकेल. विद्यापीठाकडून माजी विद्यार्थ्यांचा क्लब स्थापन करण्यात यावा यामध्ये माजी विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना उपयोग होउ शकेल. वैद्यकीय महाविद्यालयांचे व रुग्णालयांचे ऑडिट करण्यात यावे यामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचायांचे, महाविद्यालयातील सुविधांचे ऑडिट व्हावेयामुळे त्यांच्या दर्जामध्ये अधिक सुधारणा होउ शकेल असे त्यांनी सांगितले.
      ते पुढे म्हणाले की, आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे वैद्यकीय महाविद्यालयामधील रॅंगिंग कृतीबंधात्मक दिशादर्शक पुस्तिका प्रकाशित करयात आली.  राज्यातील केवळ वैद्यकीय महाविद्यालयांनाच नव्हे तर सर्व महाविद्यालयांना उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासनाने गेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत विद्यापीठाचे नाशिक येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी मान्यता दिलेली आहे, लवकरच आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजीओथेरेपी अभ्यासक्रमाची विद्यापीठाची महाविद्यालये सुरु होती असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यापीठातर्फे जीवन गौरव पुरस्कारार्थींचे आजवरचे कार्य हे दिशादर्शक आणि प्रेरणा देणारे आहे असे त्यांनी अभिनंदन करतांना सांगितले. विद्यापीठाचे मा. प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळर यांनी आरोग्य विद्यापीठाचे उपक्रम हे आरोग्य शाखांच्या विद्यार्थ्यांना निश्चितच उपयुक्त ठरणारे आहेत असे त्यांनी सांगितले.
           विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले की, विद्यार्थी केंद्रबिंदु मानुन विद्यापीठाने नेहमीच वाटचाल केली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांमध्ये रॅंगिंगमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्याने विविध संलग्नित महाविद्यालयांना भेटी घेउन ध्येय: शुन्य टक्के रॅगिंग हा उपक्रम राबविला असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी प्रास्ताविकात सांगितले की, विद्यापीठाच्या विभागीय केद्राव्दारे केल्या जाण्याया कार्याची व्याप्ती व  भूमिका स्पष्ट करुन सांगितली. याच बरोबर विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची उपस्थितांना माहिती दिली.
        या समारंभात मान्यवरांच्या हस्ते ध्येयः शून्य टक्के रॅगिंग या पुस्तिकेचे प्रकाशन विद्यापीठाचे    मा. प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केले. याच बरोबर आरोग्य शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ताींना विद्यापीठातर्फे जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात येतो. यावर्शी वैद्यकीय विद्याशाखेतील जीवनगौरव पुरस्कार डॉ. अरुण महाले, डॉ. इंदुप्रकाश गजभिये,  डॉ. शरद कोकाटे यांना तर दंत विद्याशाखेतील पुरस्कार डॉ. रमेश गांगल यांना तसेच होमिओपॅथी विद्याशाखेतील पुरस्कार डॉ. अरुण भस्मे यांना प्रदान करण्यात आले. या समारंभाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले तर मा. उपकुलसचिव डॉ. सुनिल फुगारे यांनी आभार प्रदर्शन केले. या समारंभास विविध क्षेत्रातील व्यक्ती, मा. प्राधिकरण सदस्य, मान्यवर व अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. या समारंभात कोविड-19 करीता शासनाने निर्देशित केलेल्या सूचनांचे पालन करण्यात आले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.