कंडोम वापरूनही पत्नी राहिली गर्भवती; पतीने कंपनीविरुद्ध केली तक्रार, पण…

चीनमधील ही घटना असून, कंपनीने तुम्हाला कंडोम वापरता येते काय असे स्पष्टीकरण मागताच पतीने तक्रारीचा नांद सोडून दिला

0

लोकराष्ट्र वृत्तसेवा

चीनच्या वांग आणि त्याच्या पत्नीला आधीच दोन मुले होते. त्यामुळे त्यांना तिसरा मुलगा नको होता. त्यामुळे त्यांनी कंडोमचा वापर करून लैंगिक संबंध ठेवले. लैंगिक संबंध झाल्यानंतर वांग याने कॉन्डोम काढून पाहिले असता त्याला कॉन्डोमला छिद्र असल्याचे त्याला दिसले.

यानंतर त्याला पत्नी गर्भवती राहू शकते, अशी शंका आल्याने त्याने लगेचच पत्नीला याबाबत माहिती दिली आणि गर्भनिरोधक गोळीही दिली. मात्र, तरी देखील काही दिवसानंतर त्यांची पत्नी गरोदर राहिली. त्यानंतर त्यानी संबंधित दुकानदाराकडे तक्रार दिली. तसेच कंडोमच्या कंपनीकडेही तक्रार केली.

मात्र, या कंपनीने याबाबत भरपाई देण्यास नकार देऊन त्याला गर्भनिरोधक गोळीचे पैसे हातावर टेकवले. याबाबत कंपनीने त्याच्यासमोर एक अट ठेवली. कंडोमचा वापर योग्यरीत्या तुम्हाला करता येतो का हे आधी आम्हाला सांगावे. त्यानंतरच आम्ही याबाबत उत्तर देऊ. त्यानंतर वांग यांने सांगितले की मी कंडोमचा वापर योग्य प्रकारे केला. तरीदेखील असा प्रकार माझ्यासोबत घडला. त्यानंतर त्याने हातावर हात ठेवले आणि कंपनी सोबतचे भांडण सोडून दिले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.