प्रशिक्षणार्थी अल्पवयीन परिचारिकेचे डॉक्टरने केले लैगिंक शोषण; नाशिकमधील धक्कादायक घटना

डॉक्टरला अटक; रूममध्ये एकटीच असल्याचा घेतला गैरफायदा

0

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक, सिडकोमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून आलेल्या एका अल्पवयीन परिचारिकेवर तेथील डॉक्टरनेच बलात्कार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून डॉक्टरला बेळ्या ठोकल्या आहेत. या घटनेने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी डॉक्टरवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, संशयित आरोप डॉ. उल्हास पांडूरंग कुटे (वय-५०, रा. मोरवाडी) हा रात्री १०.३० वाजेच्या सुमारास एका खासगी हॉस्पिटलमध्ये व्हीजिटसाठी गेला असता, त्याठिकाणी राहणाऱ्या एका आदिवासी समाजाच्या सोळा वर्षीय प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर त्याने अत्याचार केला. ही परिचारिका आपल्या खोलीत एकटी असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर हातपाय दुखत असल्याचे निमित्त करून तो तिच्या खोलीत शिरला. त्यानंतर दरवाज्याची कडी लावून त्याने पिडीत परिचारिकेच्या इच्छेविरुद्ध तिचे लैगिंक शोषण केले.

हा नराधम ऐवढ्यावरच थांबला नाही तर त्याने या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास, कामावरून काढून टाकण्याची धमकी देखील त्याने दिली. मात्र अत्यंत धाडस करून तिने संशयित आरोपी डॉ. कुठे याच्याविरुद्ध तक्रार नोंदविण्यासाठी पोलिसात धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी डॉ. कुटे याच्याविरुद्ध भादवी कलम ३७६, ५०४ तसेच लैंगिक अत्याचार संरक्षण पोस्को कायद्याअंतर्गत तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले असून, याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख व वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगिरथ देशमुख, महिला पोलीस उपनिरीक्षक सोनल फडोळ करीत आहेत. दरम्यान, याप्रकरणातील दोषीवर कठोरात कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी आता केली जात आहे.

आदिवासी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न

आदिवासी समाजातील अल्पवयीन मुली परिचारिका प्रशिक्षणार्थी म्हणून शहरातील बहुतांश खासगी रुग्णालयात कार्यरत आहेत. या मुलींना रुग्णालयातच राहण्यासाठी एक खोली उपलब्ध करून दिली जाते. दोघी-तिघी मिळून या मुली रुग्णालयात वास्तव्य करीत असतात. या मुलींना नाममात्र मानधन दिले जाते. डॉक्टरांच्या हाताखाली त्यांना आरोग्य सेवेतील बेसिक माहितीचे ट्रेनिंग दिले जाते. मात्र त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न हा गंभीर असून, अशाप्रकारच्या इतरही घटना यापूर्वी घडल्या असतील तर शक्यता नाकरता येत नाही. त्याचबरोबर अल्पवयीन मुलींना अशाप्रकारे प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्याची परवानगी आहे काय? हा देखील प्रश्न आहे. कारण या मुलींना दिवसाबरोबर रात्रपाळीतही राबवून घेतले जाते. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.