लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढला; जगभरात रुग्णांची संख्या वाढली

XE या नव्या व्हेरियंटने वाढवली चिंता

0

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क

कोरोनाचे संकट कमी झाल्याने बहुतांश देशांनी निर्बंध शिथिल केले आहेत. भारतातही सर्वच राज्यांमध्ये निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र आता पुन्हा एकदा जगाची चिंता वाढताना दिसत आहे. होय, कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून, भारतात चौथ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. चिंताजनक बाब म्हणजे लहान मुलांमध्येही कोरोनाचा धोका वाढला आहे.

भारतात गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांची संख्या दोन हजाराने वाढली आहे. कोरोनाच्या XE या नव्या व्हेरियंटचे रुग्ण भारतात वाढत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाच्या या नव्या लाटेचा सर्वाधिक फटका बसतोय तो लहान मुलांना. शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय आणि याआधीच्या व्हेरियंटच्या तुलनेत XE चे संक्रमण जलद गतीनं होत असल्यानं पालकांच्या छातीत धस्स झालं आहे.

लहान मुलांना ताप आणि सर्दी असेल, गळा आणि शरीर दुखत असेल, कोरडा खोकला, उलट्या आणि हगवण लागली असेल. तर तत्काळ डॉक्टरांशी संपर्क करा, असं आवाहन तज्ज्ञांनी केलं आहे.

मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी ही लक्षणं सौम्य स्वरूपाची आहेत. वेळीच डॉक्टरांची मदत घेतली तर कोरोनावर सहजपणे मात करणं शक्य होईल. पण निष्काळजीपणा केला तर तुमच्या मुलांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे काळजी घ्या आणि मुलांचं कोरोना लसीकरण वेळीच करून घ्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.