खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच; उद्धव ठाकरेंनी इतरत्र दसरा मेळावा घ्यायला हरकत नाही; रामदास आठवलेंची टीका!

बहुमत असलेली शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने त्यांना परवानगी द्यावी, असे मुंबई महानगरपालिकेला उद्देशून आठवले म्हणाले

0

ठाणे : लोकराष्ट्र वृत्तसेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेना आणि पक्षाचे चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरही दावा ठोकला. आता दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात वाद पेटला आहे. यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यास त्यांनाच परवानगी मिळाली पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी बीकेसी किंवा इतर ठिकाणी कुठेही दसरा मेळावा घ्यायला हरकत नाही, असा टोला आठवले यांनी लगावला.

बहुमत असलेली शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने त्यांना परवानगी द्यावी, असे मुंबई महानगरपालिकेला उद्देशून ते म्हणाले. रिक्षा चालकांनी शिवसेना वाढवलेली आहे. त्यांचा अपमान करणे हे योग्य नाही,असेही आठवले म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेकडून टीका करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी शिंदेंना पाठींबा दर्शविला आहे.

मनसेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सोबत घेण्याची आवश्यकता नसल्याचे ते पुन्हा म्हणाले. राज ठाकरेंना घेतले तर भाजपाचे नुकसान होऊ शकते. उत्तर भारतीयांची मते आहेत, गुजराती मते आहेत, दक्षिण भारतीय नागरिकांची मते आहेत. ही मते आपल्याला मिळणार नाहीत, त्यामुळे भाजपाला मोठे नुकसान होणार, असेही आठवले म्हणाले.

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपसोबत रिपब्लिकन पक्ष आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपा आणि आरपीआय एकत्र असताना ८२ जागी निवडून आणल्या. हे पाहता येत्या निवडणुकीत मेजॉरिटीपैकी ११४ जागा निवडून आणण्यामध्ये आपल्याला काही अडचणी येणार नाहीत, अशी भूमिकाही आठवले यांनी मांडली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.