उन्हाचा कडाका वाढला; उन्हापासून बचाव करण्यासाठी या टिप्स वाचाच…

एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे

0

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क

सध्या उन्हाचा चांगलाच कडाका जाणवत आहे. खरं पाहता महाराष्ट्रात एप्रिल, मे महिन्यात उन्हाचा कडाका जाणवतो. मात्र मार्चमध्येच उन्हाचा कडाक असह्य होऊ लागल्याने, पुढचे दोन महिने हे खूपच त्रस्त करणारे ठरणार आहे. त्यामुळे पुढच्या काळात त्वचा, डोळे, पोटाशी संबंधित समस्या, उष्माघात, डिहायड्रेशन, डोकेदुखी, त्वचेवर टॅन यासारखा त्रास उद्भवण्याची शक्यता आहे. मात्र काही सोपे उपाय केल्यास, या समस्यांपासून स्वत:चा बचाव करता येऊ शकतो.

भरपूर पाणी प्या

उन्हाळ्यात शरीराला जास्त घाम येतो. पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशनचा होऊ शकतं. डिहायड्रेशनमुळे आपल्याला चक्कर येणं, थकवा येणं, डोकेदुखी यासारख्या समस्या होऊ शकतात. दिवसभर पाणी पिणे महत्त्वाचे आहे. द्रवपदार्थाचे सेवन चांगले ठेवा, त्यात नारळ पाणी, लिंबूपाणी, ताक, लस्सी, रस यांचे सेवन करा. हे सर्व द्रव शरीरात पाण्याची कमतरता होऊ देणार नाही आणि तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल.

तेलकट-मसालेदार पदार्थ खाऊ नका

उन्हाळ्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकस, पौष्टिक आणि साधे घरगुती अन्न खाणे. जास्त तेलकट-मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पचन बिघडते. या ऋतूत हिरव्या भाज्या आणि फळे जरूर खा. खरबूज, काकडी, आंबा इत्यादी खा. जेवणात हलके तेल, मसाले घाला. उष्माघात, डिहायड्रेशन टाळण्यासाठी आंबा पन्ना, सत्तू, बेल सरबत, ताक, लस्सी प्या.

दररोज व्यायाम करा

काही लोक उष्णता वाढली म्हणून व्यायाम करणं थांबवतात. असं करू नका. सकाळी थंड वारे वाहत असताना उद्यानात, बागेत किंवा गच्चीवर जाऊन योग, ध्यान करा. शरीरात एनर्जी लेव्हल टिकून राहण्यासाठी हलका व्यायाम करा. कधी कधी उन्हाळ्यात सुस्तपणा जाणवतो. व्यायाम केल्यास आळस, थकवा, कमी ऊर्जा पातळी दूर होईल. कडक सूर्यप्रकाशात चालणे, जॉगिंग, सायकल चालवणे टाळा.

बाहेरून येताच थंड पाणी पिऊ नका

काही लोक बाहेरून येताच फ्रीजमध्ये ठेवलेल्या बाटलीतील थंड पाणी पितात. असं करणं चुकीचं आहे. शरीराची उष्णता जास्त असताना एकदम थंड पाणी प्यायल्यास त्यामुळे त्रास होतो. घसा खवखवणे, सर्दी होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे उन्हातून आल्यावर थंड पाणी पिणे. बाहेरून आल्यानंतर प्रथम एक ग्लास साधे पाणी प्या, नंतर एनर्जी ड्रिंक, ज्यूस, ताक, नारळ पाणी पिऊ शकता.

कपडे बदला

जर तुम्ही उन्हात चालत असाल तर तुमच्या कपड्यांना घाम येतो. घरी येऊन कपडे बदलायला हवे. घामाचे कपडे परिधान केल्याने त्वचेवर बॅक्टेरिया वाढू शकतात, त्यामुळे घामुळे, फोड, पुरळ यासारख्या त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.