Video : मृतावस्थेतील माकडाला काही मिनिटातच केलं जीवंत; देव बनून आला एक सामान्य माणूस!

हा व्यक्ती डॉक्टर नसून ड्रायव्हर आहे, मात्र त्याने माकडाच्या शरिरात जीव आणला

0

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क

असं म्हणतात की, ‘देव तारी त्याला कोण मारी’. यावेळी देव एका सामान्य माणसाच्या अवतारात आला अन् काही मिनिटातच मृतावस्थेतील माकडाला चक्क जीवंत केलं. माकडाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, या व्यक्तीचे सर्वत्र कौतुकही केले जात आहे.

विशेष म्हणजे ज्या व्यक्तीने ही किमया केली, तो व्यक्ती डॉक्टर नसून एक ड्रायव्हर आहे. पण ड्रायव्हर या माकडासाठी देवदूत डॉक्टररूपी देवदूतच बनून आला. माकडाच्या शरिरात जीव आणण्यासाठी या माणसाने केलेली धडपड खरोखरच कौतुकास्पद आहे. आता तुम्ही म्हणाल की, या व्यक्तीने असं नेमकं केलं तरी कसं काय?

व्हिडीओत पाहू शकता एक माकड रस्त्यावर पडलं आहे. त्याचा श्वास सुरू होता पण शरीरात कोणतीच हालचाल होत नव्हती. जीवनमृत्यूशी हे माकड झुंज देत होतं. कॅब ड्रायव्हरने त्या माकडात जीव ओतण्यासाठी आपल्या जीवाचा आटापिटा केला.

सुरुवातीला तो आपल्या हातांनी जोरजोरात माकडाच्या छातीवर दाब देत राहिला. तसंच त्याच्या तोंडात तोंड घालून आपला श्वास त्याला देत राहिला. किती तरी वेळ तो असाच करत होता. अखेर माकडात जीव फुंकण्यात तो यशस्वी झालाच. माकडाने आपले डोळे उघडले तेव्हा कुठे या व्यक्तीच्या जीवात जीव आला. त्याने भावुक होतं तसंच त्या माकडाला आपल्या छातीशी कवटाळलं.

ओडिशातील आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तामिळनाडूतील हा व्हिडीओ आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स इमोशनल झाले आहेत. सर्वजण या व्यक्तीला सॅल्युट करत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.