दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ कालावधीत होणार परीक्षा!

एप्रिल आणि मे महिन्याच्या कालावधीमध्ये परीक्षा पार पडतील

0

मुंबई : कोरोनाच्या काळात येऊ घातलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. अखेर वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार दहावीची बोर्ड परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार आहे. तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधी होणार आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे दहावी-बारावीच्या परीक्षांचे काय होणार? याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. अखेर वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांनी आता जोमाने अभ्यासाला सुरुवात केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशात दहावी-बारावीच्या परीक्षांचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यातच परीक्षा ऑनलाइन होणार की, ऑफलाइन हेही चिंता विद्यार्थ्यांमध्ये असल्याने त्यांच्यासह पालकांमध्येही संभ्रमाचे वातावरण होते. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षा ऑनलाइन होणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर विद्यार्थ्यांना वेळापत्रकाची प्रतिक्षा लागली होती. आता वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याने, परीक्षा होणार हे स्पष्ट झाले आहे. परंतु कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता, परीक्षा ऑनलाइन तर घेतली जाणार नाही ना? हाही प्रश्न कायम आहे.

दरम्यान, परीक्षेला अद्याप दोन महिने शिल्लक असून, परिस्थितीनुसार परीक्षेबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे या अगोदरच स्पष्ट केले आहे. राज्य मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल आणि मे मध्ये घेतल्या जाणार आहेत. राज्य माधयमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात.

राज्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने तसेच आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सचूनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता दिली जात असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. अगोदरच्या संभाव्य वेळापत्रकाबाबत २२ मार्चपर्यंत लेखी स्वरुपात सूचना मागवण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सुचनांनुसार हे नवे वेळापत्रक अंतिम करण्यात आलं आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.