लहानग्या तीराला वाचविण्यासाठी हवे १६ कोटींचे इंजेक्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली ‘ही’ मदत!

तीराच्या दिर्घायुष्यासाठी संपूर्ण देश प्रार्थना करीत आहे.

0

मुंबई : सध्या तीरा कामत या पाच महिन्याच्या चिमुकलीसाठी जो-तो प्रार्थना करताना दिसत आहे. मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत असलेल्या तिराला ‘SMA Type 1’ नावाच्या आजाराने ग्रासले आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी तब्बल १६ कोटी रुपये खर्च येणार आहे. होय, १६ कोटी रुपयांचे नुसतेच एक ’जोलगेंसमा’ नावाचे इंजेक्शन असून, ते भारतात आणण्यासाठी ६.५ कोटी रुपयांचा कर भरावा लागणार आहे. मात्र इतके पैसे आणायचे तरी कुठून असा प्रश्न तीराच्या आई वडिलांना सतावत असताना केंद्र सरकार तिच्या कुटुंबियांच्या मदतीला धावून आले आहे. केंद्राने कराचा हा सर्व पैसा माफ केल्याने, लवकरच तीराला हे इंजेक्शन मिळण्याची अपेक्षा आहे. 

यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मदतीसाठी धावून आले असून, मुलीच्या उपचारासाठी परदेशातून येणाऱ्या इंजेक्शनवर सूट देण्याची मागणी त्यांनी केंद्राकडे केली होती. त्याबाबतचे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनना पत्रही लिहिले होते. त्यांच्या मागणीनंतर पीएमओ कार्यालयाने तत्काळ मदत करीत इंजेक्शनवर लागणाऱ्या पूर्ण करामध्ये सवलत दिली आहे. याची माहिती स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

दरम्यान, तीराला जन्मापासूनच हा आजार असल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली आहे. तीराचे वडील मिहीर कामतने सांगितले की, जन्मानंतर तीरा घरी आली तेव्हा सर्वकाही ठीक होते. मात्र हळूहळू तिच्या प्रकृतीत बदल होत गेले. आईचे दुध पिल्यावर तीराचा श्वास कोंडला जायचा. एकदा तर तिचा श्वास थांबला होता. पोलिओ व्हॅक्सीन देतानाही तिचा श्वास थांबला होता. यानंतर जेव्हा तिला न्यूरोलॉजिस्टला दाखवले तेव्हा तिला ‘SMA TYPE 1’ आजार असल्याचे निष्पन झाले.

हा आजार मानवाच्या शरीरात एक जीन असतो, जो प्रोटीन बनवतो. यामुळे शरीरात स्नायू आणि नसा जीवंत राहू शकतात. हा जीन तीराच्या शरीरत नाही. यामुळेच तिच्या शरीरात प्रोदीन तयार होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत तीराच्या शरीरात नसा निर्जीव होउ लागल्या आहेत. मेंदुचे स्नायूदेखील आपले काम योग्य प्रकारे करत नाहीत. श्वास घेण्यापासून अन्न चावण्यापर्यंतचे काम आपल्या मेंदूचे स्नायू करतात. अशा स्थितीला SMA म्हणजेच स्पायनल मस्क्यूलर अट्रॉपी म्हणतात. हा अनेक प्रकारचा असू शकते आणि यातील टाइप 1 सर्वात गंभीर असतो.

दरम्यान, गेल्या १३ जानेवारीला तीराच्या एका फुफ्फुसाने काम करणे बंद केल्याने तिला आरसीसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर तिला व्हेंटिलेटरवर ठेवले. तीराच्या वडिलांनी सोशल मीडियावर एक पेज तयार केले असून, आतापर्यंत क्राउडफंडिंगतून १६ कोटी रुपये जमा झाले आहेत. लवकरच अमेरिकेतून ते इंजेक्शन मागविण्यात येणार आहे.  डॉक्टरांच्या मते, या आजारात मुलाचे आयुष्य फक्त १८ महिन्यांचे असते. त्यामुळेच लवकरात लवकर तीराला इंजेक्शन देणे गरजेचे आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.