IND v/s ENG : आजपासून तिसरी डे-नाईट कसोटी, भारत विजयासाठी खेळणार – विराट कोहली

पिंक बॉलसह खेळविल्या जाणारा हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे

0

अहमदाबाद : पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने विजय प्राप्त केल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवित परतफेड केली होती. त्यामुळे तिसरा कसोटी सामना हा दोन्ही संघांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जात आहे. तिसऱ्या डे-नाईट कसोटीला आजपासून अहमदाबाद येथे सुरूवात होतत असून, यामध्ये भारत विजयासाठी खेळणार असल्याचे कर्णधार विराट कोहली याने स्पष्ट केल आहे. दुपारी अडीच वाजल्यापासून सामन्याचे थेट प्रेक्षपण होणार आहे. तर ४ मार्चपासून अहमदाबाद येथेच ४ मार्चपासून चौथा कसोटी सामना खेळविला जाणार आहे.

चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिले दोन्ही सामने चेन्नई येथे खेळविण्यात आले होते. या सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दाखल होण्यासाठी अहमदाबादमध्ये होणार असलेले दोन्ही कसोटी सामने जिंकणे अथवा यातील एक सामना जिंकून दुसरा सामना अनिर्णित राखणे भारतासाठी आवश्यक आहे. अहमदाबाद येथे खेळवल्या जाणार असलेल्या दोन्ही कसोटी सामन्यांत कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न भारत करणार आहे. हे प्रयत्न यशस्वी झाले तर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात दाखल होईल.

सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत न्यूझीलंड पहिल्या, भारत दुसऱ्या, ऑस्ट्रेलिया तिसऱ्या आणि इंग्लंड चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड अंतिम फेरीसाठी पात्र झालेला पहिला संघ आहे. अंतिम फेरीत पोहोचणारा दुसरा संघ भारत-इंग्लंड कसोटी मालिकेच्या निमित्ताने निश्चित होणार आहे. याच कारणामुळे अहमदाबादमध्ये होणार असलेल्या दोन्ही कसोटी सामन्यांना महत्त्व आहे. अहमदाबादमधील दोन कसोटी सामन्यांसाठी भारत आणि इंग्लंडचा संघ जाहीर झाला आहे.

दरम्यान, या डे-नाईट कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाजाचे वर्चस्व राहणार असल्याने, त्यादृष्टीने भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे. बुमराहसह उमेश यादव याचे संघात आगम होणार आहे. त्याचबरोबर ईशांत शर्मा याचा भेदक माराही इंग्लंड संघासाठी चिंतेचा विषय ठरणार आहे. पिंक बॉलसह हा सामना खेळविला जाणार असल्याने, दोन्ही संघ यात कशी बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.