रोटरी क्लब नाशिकतर्फे शिक्षकांचा नेशन बिल्डर अवार्डने सन्मान

मुलांवर सर्वाधिक परिणाम हा शिक्षकांचा : प्राचार्य केशव नांदुरकर

0

नाशिक : प्रतिनिधी

मुलांवर सर्वाधिक परिणाम हा शिक्षकांचा होत असतो. शैक्षणिक क्षेत्रात मिळणारा सन्मान अन्य कोणत्याही क्षेत्रात नाही. शिक्षकांचे आपापल्या क्षेत्रात काम उल्लेखनीय आहे. मोबाईलचा शिक्षणात वापर कशा पद्धतीने करता येईल हे पाहायला हवे. मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी आजचे शिक्षक नवनवीन कल्पना राबवून मुलांना प्रोत्साहित करताय ही आनंदाची बाब असल्याचे प्रतिपादन के. के. वाघ इंजिनिअरींग महाविद्यालयाचे प्राचार्य केशव नांदुरकर यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे संस्थेच्या गंजमाळ येथील सभागृहात शैक्षणिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा नेशन बिल्डर्स अवार्ड सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष सीए प्रफुल बरडीया, सचिव डॉ. गौरव सामनेरकर, लिटरसी संचालक उर्मी दिनानी, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष विक्रम बालाजीवाले, मंथ लीडर निलेश अग्रवाल उपस्थित होते.

यांचा झाला सन्मान 

राष्ट्राच्या उभारणीत शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. शिक्षकांच्या या कार्याची दखल घेत रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने विविध शाळांतील १२ शिक्षकांचा नेशन बिल्डर्स अवार्ड देवून सन्मान करण्यात आला. पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे – शेख नगमा, वैशाली ठोके, मनीषा जगदाळे, वसंत हिंगणे, जय मोडक, डॉ. तुषार लोखंडे, संजय जगताप, संगिता पोरवाल, सोनी स्मिता, कल्याण पांडे, अश्विनी देशपांडे, विद्या दुगल.

यावेळी रोटरीचे अध्यक्ष सीए प्रफुल बरडीया यांनीही पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या कार्याचा गौरव करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ संचालक रवी महादेवकर, विजय दिनानी, वैशाली चौधरी, डॉ. धनंजय माने, दमयंती बरडिया, मंगेश अपशंकर, संतोष साबळे आदी उपस्थित होते. प्रारंभी उर्मी दिनानी यांनी लिटरसी मिशन विषयी मार्गदर्शन केले. अनुजा चौगुले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. गौरव सामनेरकर यांनी आभार मानले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.