व्हॅलेंटाइन डेनिमित्त ताज हॉटेलची स्पेशल ऑफर, ७ दिवसांचा मोफत मुक्काम, वाचा सत्य !

मुंबईच्या ताज हॉटेलकडून व्हॅलेंटाइन डे निमित्त एक्सपिरियन्स गिफ्ट कार्ड देत ७ दिवसांचा मोफत मुक्काम असा मेसेज व्हायरल होत आहे.

0

समाज माध्यमावर निमित्त साधून चुकीच्या अफवा पसरविणाऱ्यांची काही कमी नाही. आता व्हॅलेंटाइन डेचे निमित्त साधत चक्क मुंबईच्या ताज हॉटेलकडून व्हॅलेंटाइन डे निमित्त एक्सपिरियन्स गिफ्ट कार्ड देत ७ दिवसांचा मोफत मुक्काम असा मेसेज व्हायरल होत आहे. व्हॅलेंटाइन डे मोजक्याच दिवसांवर येऊन ठेपल्याने, अनेक कपल्स या मेसेजकडे अत्यंत गांभीर्याने बघत आहेत. मात्र वास्तविकता काही वेगळीच आहे. त्यामुळे तुम्ही हा मेसेज बघून हॉटेल ताजमध्ये ७ दिवस मुक्कामाचा बेत आखत असाल तर अगोदर ही बातमी संपूर्ण वाचा…

तास हॉटेल गिफ्ट कार्ड देत असल्याचा दावा करणारा मेसेज जर तुमच्या मोबाइलवर आला असेल तर हरकुन जाऊ नका, कारण हा एक मोठा घोटाळा आहे. स्वत: ताज हॉटेलनेच याबाबतचे एक ट्विट करून रितसर खुलासा केला आहे. त्यामध्ये म्हटले की, अशा प्रकारच्या व्हॉट्‌स ॲप मेसेजवर विश्वास ठेवू नका. या मेसेजमध्ये व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने ताज एक्सपिरियन्स गिफ्ट कार्ड देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. पण तो पूर्णपणे खोटा आहे. हॉटेलकडून अशा प्रकारची कोणतीही घोषणा करण्यातआलेली नाही, असे ताजने स्पष्ट केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.