अकोल्यातील तडीपार आरोपीचे शहरातच वास्तव्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

0

अकोला : शिवर येथील ढोने कॉलनीतील रहिवासी असलेल्या एका आरोपीस जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. मात्र तो बाभूळगाव येथील महाकाली हॉटेलमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करीत असल्याच्या माहितीवरून एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली. तसेच त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

शिवर येथील जगदीश ऊर्फ जग्गू दिवानचंद घ्यारे (वय-३०) हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्यास मुंबई पोलीस अधिनियम ५६ नुसार अकोला जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. मात्र, या तडीपारी आदेशाचे उल्लंघन करून तो बाभूळगाव जहागीर येथील हॉटेल महाकाली येथे बेकायदेशीर वास्तव्य करीत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर वानखेडे यांना मिळाली.

या माहितीवरून त्यांनी पथकासह धाव घेऊन आरोपीस अटक केली. त्याच्याविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधिक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार किशोर वानखेडे, एएसआय बोधडे, सानप, राठोड, मात्रे यांनी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.