तुकडे तुकडे गँगची आंतरराष्ट्रीय सदस्य रिहानाताईला स्वरा भास्करने ‘हा’ फोटो केला समर्पित

0

राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट करणाऱ्या अमेरिकन पॉप स्टार रिहानावरून उद्‌भवलेला वाद अद्यापही छमतांना दिसत नाही. सध्या रिहाना विरूद्ध भारतीय सेलिब्रिटी असा वाद सुरू आहे. अभिनेत्री कंगनासह अनेक सेलिब्रिटींनी ट्विटच्या माध्यमातून रिहानावर टीकेची झोड उडविली आहे. आता यामध्ये अभिनत्री स्वरा भास्कर हिनेही एक ट्विट करून रिहानाला टोला लगावला आहे.

स्वरावर सुटींगच्या सेटवरून एक ट्विट करताना रिहानावर टीका केली आहे. स्वराने ट्विटमध्ये एक फोटो शेअर केला असून, फोटो कॉफी मग दिसत आहे. त्यावर work-work-work असे लिहिलेले दिसत आहे.  तर स्वराने ट्विटमध्ये लिहिले की, ‘शुटींगचा दिवस, हा फोटो मी तुकडे तुकडे गॅंगची आंतरराष्ट्रीय सदस्य रिहाना ताईंना समर्पित करते’ अशा आशयाचे कॅप्शन फोटो शेअर करत स्वराने दिले आहे. स्वराचे हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी यावर कमेंट केल्या आहेत.

फक्त अमेरिकन पॉपस्टार रिहानाने नाही तर पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने आणि पॉर्नस्टार मिया खलिफानेही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. पण आता स्वरा भास्करने देखील रिहानाला सुनावले आहे. स्वरा भास्कर तिच्या अभिनयासोबतच वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असते. अनेक वेळा तर यामुळेच स्वरा ट्रोल होताना दिसते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.