सुश्मिता सेन-ललित मोदींचं ब्रेकअप?, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

ललित मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर प्रोफाइलवरुन सुश्मिता सेनचं नाव काढून टाकलं आहे

0

लोकराष्ट्र वृत्तसेवा

अभिनेत्री सुश्मिता सेन आणि ललित मोदी रिलेशनशिपमध्ये असल्याचा काही दिवसांपूर्वीच उलगडा झाला. त्यांच्या नात्यांबाबतची बातमी जेव्हा समोर आली तेव्हा एकच खळबळ झाली होती. मात्र आता त्यांचे हे नातं संपुष्टात आल्याचं बोलले जात आहे. सोशल मीडियावर याबाबतची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. रिलेशनशिपच्या चर्चा समोर आल्याच्या एका महिन्यातच दोघांचं ब्रेक अप झाल्याचं म्हटलं जात आहे. दोघांच्या वेगळं होण्याचं कारण सुष्मिताचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल असल्याचं म्हटलं जात आहे. काय आहे सुश्मिता आणि ललित मोदी यांच्या ब्रेकअपची भानगड जाणून घ्या.

ललित मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर प्रोफाइलवरुन सुश्मिता सेनचं नाव काढून टाकलं आहे. यावरुन दोघांचा ब्रेकअप झाल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. दोघांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर बदल केल्याचं दिसून आलं आहे. दोघांचे प्रोफाइल फोटो देखील बदलण्यात आले आहेत. सुष्मिता आणि ललित मोदी यांनी त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांवर अजून कोणताही खुलासा केलेला नाही. तसंच याबाबत दोघांनी कोणती पोस्टही केलेली नाही.

ललित मोदी यांचा आदीचा प्रोफाइल

जवळपास एक महिनाआधी ललित मोदी यांनी दोघांचे फोटो शेअर करत त्यांच्या नात्याची घोषणा केली होती. आता मोदींनी त्यांच्या प्रोफाइल आणि इन्स्टाग्राम बायोमधून सुष्मिताचा फोटो आणि नाव काढून टाकलं आहे. नवीन प्रोमफाइलमध्ये ललित मोदी हसताना दिसत आहेत. तर त्यांच्यामागे आयपीएलचं बॅकग्राऊंड दिसत आहे. तर इन्स्टाग्राम बायोमध्येही केवळ आयपीएल फाऊंडर असं दिसत आहे.  माय लव्ह सुष्मिता हे काढून टाकल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.

ललित मोदींचा आताचा प्रोफाइल

ललित मोदींनी त्यांच्या प्रोफाइलमध्ये केलेल्या या बदलांनंतर दोघांचं ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जात आहे. ब्रेकअपच्या चर्चांनंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे सुष्मिताच्या एक्स बॉयफ्रेंडची ही चर्चा रंगली आहे. दोघांच्या ब्रेअअपचं कारण तिचा बॉयफ्रेंड असल्याचं म्हटलं जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.