सुहाना खानसोबतचा ‘तो’ मिस्ट्री बाॅय कोण?, फोटो होतोय व्हायरल!

0

बॉलिवूडचा किंग शाहरूख खानची मुलगी सुहाना खान नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावरील तिचे हॉट फोटो चांगलेच पसंत केले जातात. सुहाना सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असून, नेहमीच ती तिच्या मित्रांसोबतचे फोटो शेअर करीत असते. तिचे ग्लॅमरस अंदाजातील फोटो पाहता लवकरच ती बॉलिवूडमध्ये पर्दापण करेल असेच काहीसे संकेत मिळत आहेत. दरम्यान, तिने लवकर बॉलिवूडपटात झळकावे अशी तिच्या चाहत्यांची इच्छा नसेल तरच नवल.

सोशल मीडियावर सुहानाचा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच भावतो. सध्या तिचा असाच एक फोटो व्हायरल होत आहे. फोटोमध्ये ती तिच्या मित्रांसोबत दिसत आहे. मात्र फोटोत दिसणारा तो मुलगा कोण? असा प्रश्न तिच्या चाहत्यांकडून विचारला जात आहे. सुहानाने इन्स्टाग्राम स्टोरीला काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत दिसत आहे. पण सर्वाज जास्त चर्चा या फोटोमध्ये दिसणाऱ्या मुलाच्या रंगल्या आहेत. हा मिस्ट्री बॉय कोण आहे ज्याच्यासोबत सुहाना पोज देत आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण तो मुलगा कोण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या फोटोमध्ये सुहाना अतिशय हॉट अंदाजात दिसत आहे. तिने फिकट आकाशी रंगाचा क्रॉप टॉप आणि निळ्या रंगाची पँट परिधान केली आहे. या लूकमध्ये सुहाना अतिशय हॉट आणि बोल्ड दिसत आहे. तिचा हा लूक देखील सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच सुहानाच्या नाइट पार्टीमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे फोटो चर्चेत होते. त्यावेळी देखील सुहानाचा बोल्ड लूक चर्चेत होता. सुहाना सध्या तिचे शिक्षण घेत असून ती न्यूयॉर्कमध्ये आहे. ती सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना माहिती देत असते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.