भीषण अपघतात माजी अर्थमंत्र्यांच्या बहीण आणि भावोजीचा दुदैवी मृत्यू

कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला असून, ही कार पुलावरून खाली कोसळली आहे

0

बीड : माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवर यांची चुलत बहीण आणि भावोजी यांचे कार अपघातात दुदैवी निधन झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे मुनगंटीवार यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची बहीण व भावोजी ज्या कारमध्ये बसले होते ती भरधाव कार पुलाखाली कोसळल्याने ही दुदैवी घटना घडली.

उपलब्ध माहितीनुसार बुधवारी रात्रीच्या सुमारास गेवराई तालुक्यातील चकलांबा गावानजीक एक भरधाव कार पुलावरून खाली पडून भीषण अपघात झाल्याचे समोर आले होते. या अपघात ममता तगडपल्लेवार आणि विलास तगडपल्लेवार या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले होते. हे दाम्पत्य माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांची चुलत बहीण आणि भावोजी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मृत तगडपल्लेवार दाम्पत्य पुसद येथून स्वतःच्या वाहनाने पुण्याला मुलाला भेटण्यासाठी निघाले होते. त्यावेळी दुर्देवी अपघात झाला. तिंतरवणी येथे ही गाडी भरधाव असल्याने पुलाखाली जाऊन अपघात झाला. यामध्ये दोघे पती पत्नी जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.