यशस्वी उद्योजक रतन टाटा यांनी सांगितलेला ‘हा’ यशाचा मंत्र

या ११ गोष्टी अंगिकारल्यास यश निश्चित मिळेल

0

लोकराष्ट्र वृत्तसेवा : रतन टाटा हे प्रत्येक तरुणांसमोर आदर्श असलेले व्यक्तिमत्त्व. आयुष्यात एवढ्या मोठ्या पदावर असतानाही नेहमीच जमिनीवर पाय ठेवून वागणारा उद्योजक म्हणूनही त्यांच्याकडे बघितले जाते. त्यांनी निर्माण केलेले आदर्श हे अनेकांसाठी दिशादर्शक आहेत. विशेषत: तरुणी पिढीसाठी ते खूपच अनमोल आहेत. आज आम्ही या लेखातून त्यांनी सांगितलेल्या ११ महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत.  अर्थात या गोष्टी आयुष्यात यशस्वी होण्याचा मार्ग सुकर करणाऱ्या आहेत.

समाजाचे देणं लागतं : आपण ज्या समाजात वाढतो, त्याचे आपण देणं लागतो ही कृतज्ञता प्रत्येक यशस्वी व्यक्तीने बाळगायलाच हवी. जोपर्यंत उद्योजक विक्री, त्यांचे टार्गेटस, नफा या पलिकडे जावून विचार करणार नाहीत, तोपर्यंत ते आयुष्यात यशस्वीतेचा टप्पा गाठणार नाहीत. यशस्वी उद्योजकाने नेमहीच समाजहिताचा विचार करून वावरायला हवे. तसेच कंपनीमधील निस्वार्थीपणे देण्याच्या या कर्मचाऱ्यांच्या मनात संस्थेबद्दल आदर निर्माण होतो आणि तो वाढत राहतो. या सवयींमुळेच परस्परांबद्दल आदर निर्माण होऊन आपण राहत असलेल्या समाज अधिकिधिक जगण्यालायक बनतो.

जिद्द, चिकाटी : जोपर्यंत जिद्द, चिकाटी या दोन गोष्टी आपण आत्मसात करीत नाही, तोपर्यंत यशाचा मार्ग प्रशस्त होत नाही. त्यामुळे यश मिळेपर्यंत प्रयत्न करत राहण्याची क्षमता निर्माण करायला हवीच. अर्थात या वाटचालीत तुम्हाला अनेकदा अपयशाचाही सामना करावा लागू शकतो, मात्र जिद्द आणि चिकाटी कायम ठेवूनच वाटचाल करावी लागणार आहे.

स्वत:मधील गुणवैशिष्ट्ये : प्रत्येकांमध्ये क्षमता असते. ती ओळखणे गरजेचे आहे. जोपर्यंत आपण आपल्यातील क्षमता ओळखत नाही, तोपर्यंत आपल्या निश्चित यश साध्य करता येणार नाही. त्यामुळे व्यवसाय करताना दृश्य कौशल्यांवर लक्ष केंद्रीत करून ती जास्तीत जास्त परिपूर्ण बनण्यावर भर देणे महत्त्वाचे असते. शिवाय हीच गोष्ट आपल्या कर्मचाऱ्यांकडून नियमितपणे करून घेणे ही नेतृत्वाची जबाबदारी असते.

शिक्षणाचे महत्त्व : माणसाच्या आयुष्यात शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे नवनवीन कौशल्ये आत्मसात करण्याची वृत्ती अंगी बाळगायला हवी. नवनवीन क्षीतिजाला गवसणी घालण्यास उत्सुक लोकांसाठी ते कधीही थांबत नाही.

जीवन : तुमचे जीवन जसं आहे तसेच स्वीकारा, त्यावर प्रेम करा, ते प्रत्येक क्षण जगा, इतरांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका. याही पुढे जाऊन सांगायचे झाल्यास लोकांना तुमच्यावर करायची तितकी चिखलफेक करू द्या, त्याचाच वापर करून आपण आपला महाल उभा करा.

निर्णयक्षमता : जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला निर्णयक्षमता खूप गरजेची असते. यश मिळवण्यासाठी वैचारिक स्पष्टता आवश्यक असते. त्यामुळे आपल्याला काय हवंय, याची सर्वप्रथम खात्री करून घ्या आणि मगच त्या अनुषंगाने आपले नियोजन करा.

सकारात्मक मानसिकता : तुमच्या मानसिकतेमुळे तुमचे निश्चित ध्येय पूर्ण होते किंवा नाही. यशस्वी होण्यासाठी यशाचा ध्यास घेणारी मानसिकता निर्माण करा. नेहमी सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा आणि अनावश्यक ताणतणावापासून स्वत:ला काही काळ दूर ठेवा.

बदल आवश्यक आहे : तुम्हाला माहितच आहे की, बदल ही एकमेव अपरिवर्तनीय गोष्ट आहे. त्यामुळे तो स्वीकारा आणि पुढे वाटचाल करा. नवीन कल्पना मांडत राहा. उद्योगात नवनवीन प्रक्रिया आणत राहा आणि प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने करत राहा. होणाऱ्या बदलांना सकारात्मक दिशा द्या.

आव्हाने स्विकारा : मार्गातील कोणत्याही अडथळ्यांकडे आव्हान म्हणून बघा आणि त्यावर मात करणे शक्य नाही, असा विश्वास बाळगा. कठीण परिस्थितीत स्वत: नेत्याची भूमिका घेणेच उद्योजकांसाठी उत्तम ठरते. आपले भागधारक आणि निकटवर्तीय यांना मार्गदर्शन करा.

वारसा जपा : तुमच्या पूर्वजांनी मागे ठेवलेला मुल्ये, नैतिकता आणि संस्कृतीचा वारसा जतन करा. फक्त नफेखोरीवर नाही, तर दीर्घकालीन स्थैर्यावर आधारित उद्योग निर्माण करा. पैसा जरी आवश्यक असला तरी, शाश्वत विकास हा उद्योगाचा आत्मा आहे.

वाढ : एकदा काय हवंय म्हणजेच आपल्याला ध्येयाबद्दल स्पष्टता आली की, ते मिळवण्यात तुमची संपूर्ण शक्ती केंद्रित होईल आणि हाच व्यावसायिक वृद्धीतील मैलासा दगड ठरतो.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.