कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिकमध्ये कडक निर्बंध, जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

१५ मार्चनंतरच्या विवाह सोहळ्यांना बंदी

0

नाशिक : नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, दररोज वाढती रुग्णसंख्या प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून सरासरी पाचशेपेक्षा अधिक रुग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने आणखी कठोर निर्बंध लादले आहेत. याबाबतची घोषणा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सोमवारी केली आहे.

दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचा इशारा दिला होता. मात्र अशातही नाशिककरांकडून नियमांचे पालन होत नसल्याने कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. त्याबाबतची पत्रकार परिषद घेऊन त्यांनी निर्णय घोषित केला आहे. तसेच जो कोणी निर्णय पाळणार नाही, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही त्यांनी याप्रसंगी दिला.

जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेले निर्णय असे…

 • नाशिक व मालेगावमधील संबंधित शाळा, कॉलेज व कोचिंग क्लासेस पुढील आदेशापर्यंत बंद.
 • इयत्ता १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत उपस्थिती राहणे ऐच्छिक राहील.
 • नाशिक, निफाड, नांदगाव व मालेगाव तालुक्यातील सर्व शाळा बंद राहतीतल.
 • आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शनिवारी व रविवारी सर्व धार्मिक स्थळे बंद राहतील.
 • जीम, स्विमिंग टँक किंवा मैदाने ही केवळ व्यक्तीगत सरावापुरते सुरू राहतील किंवा त्यांचा वापर करता येईल.
 • खेळांच्या सर्व स्पर्धांना बंदी असेल.
 • सार्वजनिक विवाह सोहळ्यांना १५ मार्चनंतर बंदी असणार.
 • सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ७ यावेळेतच सुरू राहणार.
 • जीवनावश्यक वस्तू दुकानांना सुट.
 • धार्मिक स्थळे सकाळी ७ ते सायंकाळी ७ यावेळेतच खुली राहणार.
 • सर्व आठवडे बाजार बंद राहणार.
 • हॉटेल, परमिटरूम व बियर बार यांच्यावर वेळेचे निर्बंध असतील. हे सर्व सकाळी ७ ते रात्री ९ यावेळेतच सुरू राहतील. ५० टक्के क्षमतेची अट असेल.
 • १५ मार्चपर्यंत जे नियोजित विवाह आहेत, ते होऊ शकतील. मात्र, त्यांना पोलीव व स्थानिक प्रशासनाची परवानगी बंधनकारक असेल.
 • सामाजिक, धार्मिक व राजकीय समारंभ आयोजित करता येणार नाही.
 • भाजी मार्केट ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.