धक्कादायक : लग्नासाठी दुसरीच नवरी उभी करून चार लाख रुपयांना लावला चुना

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील घटना

0
नाशिक : लग्नासाठी नकली नवरी उभी करून ३ लाख ९९ हजार १०० रुपयांची फसवणूक केल्याच्या संशयावरून नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटना मागच्या वर्षी नांदगाव तालुक्यातील गंगाधरी येथे दि. २४ जून २०२० रोजी घडली होती. त्या संदर्भात गुन्हा मंगळवारी (दि.९) रोजी  दाखल झाला आहे. पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातला वडकी नाला गावचा निलेश दरेकर (३४) वडापाव विक्रेता याने फिर्याद दिली असून संशयित आरोपी संतोष उगलमुगले, मालेगाव, योगेश वाघ (रावळगाव), बालाजी आहेर (पता माहित नाही), विजय चव्हाण (रावळगाव), पूजा शिंदे रा. एकरुखे, ता. राहता जिल्हा अहमदनगर, मुलीचे मामा अनिल मोरे, मामी शीतल मोरे यांनी संगनमताने फसवले अशी तक्रार केली आहे.
गंगाधरी येथे पार पडलेल्या लग्नात पूजा शिंदे हिला तीन लाख रुपये रोख, ९० हजारांचे सोन्याचे व ९१०० रु.चे चांदीचे दागिने फिर्यादी निलेश याने घातले. त्यानंतर संशयित पूजाचे नातेवाईक असल्याचे भासवून तिला घेऊन फरार झाले. या प्रकरणी फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अनिल कातकाडे याच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.