धक्कादायक : परप्रांतीय तरुणाचे तीन वर्षीय बालकाला घेऊन पलायन

0
नाशिक : सिन्नर तालुक्यातील  वैदूवाडी भागातील तीन वर्षीय बालकाला घेऊन परप्रांतीय तरुणाने पलायन केल्याची खळबळजनक घटना रविवारी (दि.८) दुपारी घडली.
साहिल नितीन सिरसाट असे बालकाचे नाव असून त्याच्या आईने याबाबत पोलिसात तक्रार दिली. मोलमजुरी करणारा शंकर सिंग नामक परप्रांतीय तरुण गेल्या तीन-चार वर्षांपासून भाड्याने खोली घेऊन वैदूवाडी भागात रहात होता. सिरसाट कुटूंबीयाच्याकडे त्याचे येणे-जाणे होते, असे सांगण्यात येते. अशातच त्याने मुलाला पळवून नेल्याची तक्रार आईने दिली. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.